बातमी

मुरगूडच्या गणेश नागरीच्या सभापतीपदी उदयकुमार शहा तर उपसभापतीपदी प्रकाश हावळ बिनविरोध

मुरगुड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सहकारी पत संस्थांमध्ये अग्रगण्य मानल्या गेलेल्या व स्व. खा. सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रेरणेतून अल्पावधीत प्रगतीपथावर पोहचलेल्या श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली.

यामध्ये उदयकुमार छगनलाल शहा यांची सभापतीपदी तर प्रकाश बाळकृष्ण हावळ यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. ही निवडीची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी ए. एन. शिंदे कागल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .

मावळते चेअरमन एकनाथ पोतदार व व्हा.चेअरमन श्रीमती मंगल यरनाळकर यांचा २०२१ / २२ आर्थिक सालात उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर नूतन चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल उदयकुमार शहा व व्हा.चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश हावळ यांचा निवडणूक अधिकारी श्री शिंदेसो यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

सन २०२२ ते २०२७ या सालाकरीता नवनिर्वाचित बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ पुढील प्रमाणे :एकनाथ शंकर पोतदार , आनंदराव शंकर देवळे, मारुती गणपती पाटील, सुखदेव गणपती येरुडकर , सोमनाथ दिपक यरणाळकर, राजाराम बाळू कुडवे, आनंदा यशवंत जालीमसर , दत्तू रामा कांबळे, सौ. रूपाली भारत शहा, ॲड.सौ. रेखा खाशाबा भोसले.

ही निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडण्यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक राहुल शिंदे व सहाय्यक सचिव चिदंबर एकल यांचे मौलिक सहकार्य लाभले. या निवडीच्या बैठकीस आजी – माजी संचालक व संस्था पदाधिकाऱ्यांसह सर्व सेवक वर्ग उपस्थित होता. यावेळी ॲड.रेखा भोसले ॲड.खाशाबा भोसले सोमनाथ यरनाळकर आदींनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत नूतन चेअरमन उदयकुमार शहा यांनी, प्रास्ताविक एकनाथ पोतदार यांनी तर आभार राहुल शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *