मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल पंचक्रोशीमध्ये आग्रगण्य मानल्या गेलेल्या श्री . व्यापारी नागरी सह .पतसंस्थेला ४९ लाख२० हजाराचा नफा झाला आहे, १६ कोटी१० लाख ठेवी जमल्या आहेत अशी माहिती चेअरमन मा . श्री . किरण गवाणकर , कार्यलक्षी संचालक सुदर्शन यानीं दिली. चेअरमन माहिती देतानां पुढे म्हणाले , सभासद , ठेवीदार , कर्जदार , विनम्र सेवकवर्ग आणि हितचिंतकाच्या बळावर संस्थेने चढता आलेख गाठत गरूड भरारी घेतली आहे.
मुरगूड येथिल बाजारपेठेत मुख्य शाखेबरोबरच मुदाळ तिट्टा येथेही शाखा सुरु केली आहे . सर्व व्यवहार संगणकिकृत आहे . मुरगूड येथे बाजारपेठेत सुसज्य अशी स्व मालकीची इमारत आहे.राखीव निधी १ कोटी३७ हजार , ठेवी१६ कोटी१० लाख , कर्जे ११ कोटी ८७ लाख , गुंतवणूक ५ कोटी २३ लाख , उलाढाल ९३ कोटी , वसुलभागभांडवल ३१ लाख ८१ हजार , ऑडीट वर्ग ” अ ” ( सन२०२० / २०२१ ), सभासदानां१३ टक्के लाभांश दिला जातो असे त्यानीं सांगितले.
यावेळी उपसभापती सौ. रोहीणी तांबट, संचालक सर्वस्वी . श्री .प्रशांत शहा , साताप्पा पाटील , हाजी .धोंडीबा मकानदार, किशोर पोतदार, नामदेवराव पाटील , शशिकांत दरेकर , प्रदिप वेसणेकर , यशवंत परीट, प्रकाश सणगर, संदीप कांबळे, सुरेश जाधव, महादेव तांबट, संचालिका सौ . संगीता-नेसरीकर,कार्यलक्षी संचालक सुदर्शन हंडेकर , सेवकवृंद उपस्थित होते .