श्री गहिनीनाथ उरुसाचे धार्मिक विधी जाहीर

कागल : येथील प्रसिद्ध श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुस सालाबादप्रमाणे होणार आशून याच्या धार्मिक विधीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कागल येथील शाहू नगर वाचनालय येथे पार पडलेल्या उरूस कमिटीच्या मिटिंग मध्ये पुढील धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा देण्यात आली. यावेळी कागल नगरपरिषद मुख्याधिकारी पावन म्हेत्रे, प्रताप उर्फ भैय्या माने, प्रकाश गाडेकर, रमेश माळी, प्रवीण काळबर, सम्राट सणगर, … Read more

सर्वांगीण विकासासाठी महिला व बालकांना संधी उपलब्ध करून द्या – पालकमंत्री हसन मुश्रीफ

बालस्नेही व लिंगभाव अनुकूल पंचायत कार्यक्रमांतर्गत विविध पुरस्कारांचे वितरण कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : भारतात लोकसंख्येचे प्रमाण जगात दुसऱ्या नंबरवर आहे. समाजाचा, देशाचा विकास जलद गतीने करण्यासाठी मुलांना वाव दिल्यास तसेच महिलांना विविध ठिकाणी संधी उपलब्ध करून दिल्यास सर्वांगीण विकास साधने शक्य आहे असे प्रतिपादन पालकमंत्री असं मुश्रीफ यांनी केले. युनिसेफ आणि ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त … Read more

राष्ट्रीय महामार्गावर खुलेआम गांजा विकणाऱ्या तरुणास अटक

कागल(विक्रांत कोरे) : कागल राष्ट्रीय महामार्गावर खुलेआम गांजा विकणाऱ्या 35 वर्षीय तरुणास कागल पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसाबरोबर झालेल्या झटापटीत कागल पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल प्रभाकर पुजारी यांना दुखापत झाली आहे. वैभव विजय पाटील वय वर्ष 35 राहणार प्लॉट नंबर 299, जयसिंग पार्क ,कागल ,असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 52 हजार … Read more

कोल्हापूर जिल्हा पर्यटनाच्या माहितीसाठी ॲप व दुरध्वनीचा वापर करावा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर दि. 20 (जिमाका) : जगभरातील पर्यटकांना कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती सहजगत्या उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने भवानी मंडप येथील पागा इमारतीमध्ये नुकतेच पर्यटक सुविधा केंद्र स्थापन झाले असून या केंद्रामध्ये 02312545411 हा दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित झाला आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांशी संबंधित माहिती हवी असल्यास नागरिकांनी डेस्टिनेशन कोल्हापूर या ॲपचा वापर करावा व या दुरध्वनी … Read more

कोल्हापूर विभागीय हॉलीबॉल स्पर्धैला मुरगूडात प्रारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ) : शिवाजी विद्यापीठांतर्गत, कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेला मुरगूडात शानदार प्रारंभ झाला. येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या वतीने शिवराज हायस्कूलच्या व्हॉलीबॉल मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत मुरगूडचे मंडलिक महाविद्यालय, एस. के. पाटील कॉलेज (कुरुंदवाड), डी. आर. माने कॉलेज (कागल) आणि देवचंद कॉलेज … Read more

मुरगूडमध्ये मोफत नेत्र तपासणी व अल्प खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मेहता आय केअर अँन्ड लेजर सेंटर , लकी शेती सेवा केंद्र व एम .जे. अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व अल्प खर्चामध्ये मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येणार असून रुग्णानीं यांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे . मुरगूड बाजारपेठेतील ” लकी शेती … Read more

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आरएन्आय कडून सुलतानी फतवा निर्णयाचा फेरविचार करावा – आप्पासाहेब पाटील

सांगली – अंक प्रकाशित झालेनंतर 48 तासात अंक RNI आणि PIB कार्यालयात पाठवने बंधनकारक आहे. तसे न केल्यास प्रति अंकास 2000 प्रमाणे दंड लागू होऊन सातत्याने अंक प्रकाशित न केल्यास अंकाची मान्यता रद्दही होऊ शकते. असा सुलतानी फतवा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आर एन आय ने काढला आहे. प्रिंटिंग मीडियासाठी हे अडचणीचा आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा … Read more

मंडलिक महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त अमृत कलश शोभायात्रा

मुरगुड ( शशी दरेकर ) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना (एन सी सी) व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षानिमित्त ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत कागल तालुक्यातील प्रमुख महाविद्यालयांतून संकलित झालेल्या अमृत कलश शोभायात्रा महाविद्यालय ते शिंदेवाडी पर्यंत काढण्यात आली. या शोभायात्रेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. टी. एम. … Read more

अंत:करणात भावनांची खळबळ उडवून देणारं लेखन दीर्घकाळ अंतःकरणाच्या गाभाऱ्यात दरवळत राहतं – भैरवनाथ डवरी

मुरगूड ( शशी दरेकर ) – अंत:करणात भावनांची खळबळ उडवून देणारं लेखन दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधा प्रमाणे अंतःकरणाच्या गाभाऱ्यात दरवळत राहतं. असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भैरवनाथ डवरी यांनी केले. बोरवडे ता. कागलं येथील बोरवडे विद्यालय येथे वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुख्याध्यापक ए आर वारके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. … Read more

शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सव : नारी शक्तीचे दर्शन घडवणार “नवदुर्गा महिला रॅली”

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी  सकाळी 8 ते 11 या वेळेत “नवदुर्गा महिला रॅली” आयोजित करण्यात आली आहे. पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, पत्रकार, वकील, नर्स, प्रशासकीय अधिकारी, क्रीडा क्षेत्रातील महिला, विद्यार्थिनी तसेच विविध संस्था, संघटनांतील महिलांचा सहभाग असणारी ही “नवदुर्गा महिला … Read more

error: Content is protected !!