ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करून घेण्याचे आवाहन

मुंबई, दि. 26 : ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधारकांनी वाहनाच्या इलेक्ट्रॉनिक फेअर मीटरमध्ये 15 जानेवारी, 2023 पर्यंत बदल (रिकॅलिब्रेट) करुन घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई यांनी केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ऑटो रिक्षा व टॅक्सी पवाना धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी … Read more

Advertisements

ग्राहकांचे हित जोपासणारे व्यवस्था निर्माण व्हावी – भास्कर चंदनशिवे

सिद्धनेर्ली/ प्रतिनिधी – बाजारातील वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहक हा केंद्रबिंदू झाला आहे. या स्पर्धेतून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच उपयुक्त आहे. ग्राहकांनी आपल्या हक्काबद्दल जागृत राहावे.यासाठी ग्राहकांचे हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर चंदनशिवे यांनी केले. सिद्धनेर्ली ता. कागल येथे प्रियदर्शनी इंदिरा हायस्कूल मध्ये … Read more

‘माती वाचवा’ अभियानासाठी फ्रान्सच्या महिलेची सायकलवरून जनजागृती

कागल शहरात त्यांचे स्वागत करून सत्कार संपन्न कागल : नतालिया…वय वर्षे 50 ही महिला फ्रान्स ते भारत तेही सायकलवरून ‘माती वाचवा’ अभियानासाठी (save soil.org ) बाहेर पडली आहे. फ्रान्सपासून इराण व पाकिस्तान देश वगळून सायकलवरून प्रवास करीत कागल नगरीत रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी आली होती. कागल नगरीत त्यांना फेटा बांधून शाल, हार देऊन सन्मानित … Read more

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जमंजुरी पत्रांचे कागलमध्ये वितरण

कागल : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला आहे, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. कागलमध्ये केडीसीसी बँकेच्यावतीने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज मंजुरीपत्रांच्या वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, केडीसीसी बँकेने निव्वळ शेतीसाठी कर्जपुरवठा करणारी बँक, ही जुनी ओळख कधीच पुसली … Read more

कोविड परिस्थिती नियंत्रणात ; नागरिकांनी घाबरून जाऊ नये

जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची पालकमंत्र्यांनी दक्षता घ्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश नागपूर, दि. २२ : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद … Read more

वाघापूरच्या सरपंचपदी बापूसो आरडे यांची निवड

मडिगले (जोतीराम पोवार ) : वाघापूर तालुका भुदरगड येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ज्योतिर्लिंग बिरदेव ग्राम विकास आघाडीने सरपंच पदासह आठ जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली विरोधी गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. येथील अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत तीन आघाड्या झाल्या प्रत्यक्षात मात्र माजी आमदार के पी पाटील व विद्यमान आमदार प्रकाश आबीटकर यांच्या गटात … Read more

पै.कौतुक शिंदे यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुरगुड ( शशी दरेकर ) : शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित मुरगुड विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज ता. कागलचा मल्ल कौतुक सुरेश शिंदे इयत्ता आठवी याची कोल्हापूर येथील मोतीबाग तालीम येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत ४८ किलो वजन गटात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. अत्यंत चुरशीच्या आणि खडतर स्पर्धेत तब्बल सात प्रतिस्पर्धी मल्लांना हरवून त्याने अंतिम … Read more

कागल – गडहिंग्लज -उत्तूर विधानसभा मतदारसंघात ४६ पैकी २१ लोकनियुक्त सरपंच राष्ट्रवादीचे

३१ सरपंच पदांवर महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी…… कागल : कागल तालुका मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण २८ ग्रामपंचायत निकाल जाहीर झाले आहेत. त्यापैकी दहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, सहा ठिकाणी बीजेपीची सत्ता आलेली आहे व चार गावांमध्ये संजय घाटगे गटाचे, सात ठिकाणी मंडलिक गटाचे सरपंच पदाच्या उमेदवारांनी बाजी मारलेले आहे. या निकालानंतर राष्ट्रवादी कडून पत्रकार परिषदेत घेत … Read more

कागल तालुक्यातील ग्रामपंचायत निकालाचा कल संमिश्र

कागल : कागल तालुका मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एकूण 13 ग्रामपंचायत निकाल जाहीर झाला. त्यापैकी पाच ठिकाणी बीजेपी ची सत्ता आलेली आहे. सहा ठिकाणी मुश्रीफ गट व तीन ठिकाणी मंडलीक व संजय घाटगे गटाचे चार सरपंचपदासाठी उमेदवारांनी बाजी मारलेले आहे. कागल तालुक्यातील २८ ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचा कल हा समिश्न असून यामध्ये भाजपचे बाचनी, रणदेवीवाडी, बामणी, निढोरी, … Read more

जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे प्रारूप आराखडे आय-पास प्रणालीवर त्वरित सादर करावेत – प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे

कोल्हापूर : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडे सर्व विभागाकडून विविध विकास कामासाठी निधी मागणीचे प्रस्ताव सादर केले जातात. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे प्रारूप आराखडे सादर करताना यंत्रणांनी संगणकीय आय-पास(I-PASS) प्रणालीवर त्वरित सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शाहू सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या पूर्वतयारी … Read more

error: Content is protected !!