बातमी

सिद्धनेर्ली येथे रक्तदान शिबिर

पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : सिद्धनेर्ली ता कागल येथील 1993  दहावीची बॅच आणि प्रांजल फाउंडेशन यांच्या वतीने १ मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन यांचे औचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केले होते या रक्तदान शिबिरामध्ये तीन महिला रक्तदात्यांसह 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदानाचे हे सातवे वर्ष होते रक्तदान शिबिराचे उद्घाटन सिद्धगिरी हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर तनिष पाटील सर यांच्या हस्ते झाले.

गावामध्ये दर वर्षी हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. यावर्षी देखील कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे  ओचित्य साधून रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यावेळीं कागल येथील भिमा आय केअर चे चिकित्सक डॉक्टर अमर पाटील यांनी मोफत नेत्र तपासणी केली.

या प्रसंगी सिद्धनेर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्याचे प्रमुख डॉक्टर, प्रांजल फौडेशन अध्यक्ष एम पी गोनुगडे  बाचणी गावचे माजी सरपंच निवास पाटील ,वनिता घराळ आणि सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होत्या.

यावेळी याप्रसंगी श्री सिद्धनेर्ली क्रेडिट को ऑपरेटिव्ह क्रेडीट  सोसायटीचे चेअरमन विक्रम पाटील तसेच सुदाम पाटील, सुधीर पाटील, कॉम्रेड शिवाजी मगदूम, श्री.राहुल महाडीक, एम.बी .पाटील, प्रा. सुनिल मगदूम उपस्थित होते.

One Reply to “सिद्धनेर्ली येथे रक्तदान शिबिर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *