वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४६ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४६ दिनांक १३-०७-२०२६ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २७ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

निधन वार्ता – माधवी चव्हाण

मुरगूड ता. कागल येथिल माधवी मारुती चव्हाण वय ५९ यांचे आकस्मित निधन झाले. दूरध्वनी खात्यातील कर्मचारी मारुती चव्हाण यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा दोन मुली नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या रविवार दिनांक १२ -७-२०२६ रोजी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

राज्याच्या आरोग्य विभागातील  १५ हजार कंत्राटी कर्मचारी होणार शासकीय सेवेत समाविष्ट : माजी खासदार प्रा. संजय मंडलिक

राज्य संघटनेकडून माजी खासदार मंडलिक यांचा सत्कार वेतनासाठी ११५३  कोटी रुपये खर्चास शासनाची मान्यता कोल्हापूर जिल्ह्यातील ६५०  कर्मचा-यांना लाभ मुरगूड (शशी दरेकर) : आरोग्य विभागाकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत असणाऱ्या १५ हजार १० कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत समविष्ठ करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी  सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास … Read more

कागलमध्ये घराची भिंत कोसळून ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

कागल: कागल शहरातील लोहार गल्ली येथे राहत्या घराची भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात ३८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, उर्मिला उदय कुलकर्णी असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी रात्री साधारण १०.४५ च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. अचानक घराची भिंत कोसळल्याने उर्मिला कुलकर्णी यांच्या अंगावर पडली, ज्यात त्या गंभीर जखमी … Read more

बेनिक्रे ग्रामपंचायतीमधील वाद कायम; खुलाशाऐवजी पुन्हा ग्रामसभेचे आश्वासन, ग्रामस्थांचा संताप

कागल: बेनिक्रे ग्रामपंचायतीमध्ये ‘माझी पंचायत’ पोर्टलवर चुकीचे फोटो अपलोड केल्याचा वाद अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व तरुणांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, विकास कामांमधील अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला होता. प्रशासक, सदस्य आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी चार दिवसांत खुलासा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती, परंतु प्रशासनाने केवळ … Read more

पावसाळ्यात जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

मुरगूड ( शशी दरेकर ) : सध्या पावसाळा सुरू झाल्याने जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. मुरगूड नगरपरिषद कडुन शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा केला जात आहे तथापी अति पावसामुळे गढूळ पाणी पुरवठा झालेस , कॉलरा, टायफॉइड, कावीळ यांसारख्या  जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यासाठी नागरिकांनी १५ ते २० मिनिटे पाणी … Read more

पेठवडगाव हादरले! कौटुंबिक वादातून भरदिवसा पत्नीची हत्या

पेठवडगाव : पेठवडगाव येथे भरदिवसा एका महिलेची धारदार शस्त्राने हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. सावर्डे येथील कुटुंबाशी ही घटना संबंधित असल्याचे समजते. पत्नीचा खून तिच्या पतीनेच केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे, मात्र पोलीस प्रशासनाकडून … Read more

best-selling-products-on-amazon-Maharashtra

महाराष्ट्रातील (विशेषतः कोल्हापूर परिसरातील) ग्राहकांमध्ये सध्या अमेझॉनवर लोकप्रिय असलेल्या आणि उत्तम रेटिंग मिळालेल्या काही वस्तूंची यादी खालीलप्रमाणे आहे: १. इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) आजच्या काळात दर्जेदार ऑडिओ आणि पोर्टेबल उपकरणांना मोठी मागणी आहे. २. घरगुती उपकरणे (Home & Kitchen Appliances) स्वयंपाकघरातील कामात मदत होईल अशा उपकरणांना घराघरातून मोठी मागणी असते. ३. पुस्तके (Literature & Personal Growth) वाचकवर्गात … Read more

गुन्हेगारीला खतपाणी घालणारी अंधश्रद्धा कशाला ?

अघोरी विचारातून रस्त्यावर लिंबू-मिरची टाकल्याने, करणीमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते, अघोरी विधी केल्याने शत्रूचा नायनाट होतो किंवा चमत्काराने आजार बरा होतो, अशा समजुती जेव्हा माणसाच्या विवेकावर मात करतात, तेव्हा अंधश्रद्धा ही केवळ वैयक्तिक श्रद्धेची बाब राहत नाही; ती गुन्हेगारीला खतपाणी घालणारी सामाजिक समस्या बनते. भीती, असहायता आणि अज्ञान यांचा गैरफायदा घेत विकृत भोंदू बाबा, मांत्रिक … Read more

कोल्हापुरात शाहू मिल परिसरात संरक्षक भिंत कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक शाहू मिल परिसरात आज अचानक एक संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. या अनपेक्षित प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. भिंत कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस, भिंतीचे जुने झालेले बांधकाम किंवा देखभालीचा अभाव या कारणांमुळे ही दुर्घटना घडली … Read more

error: Content is protected !!