राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
कागल : महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर ॲथलेटिक चॅम्पियनशिप २०२६ या राज्यस्तरीय स्पर्धेत कागलच्या सरलादेवी यशवंतराव माने बॉईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूल चा विद्यार्थ हर्षवर्धन सुभाष पाटील याने भालाफेक क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली.
तारीख २७ ते ३० ऑगस्ट २०२६ दरम्यान डेरवण (ता. चिपळूण) येथील SVJCT Sports Academy येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये हर्षवर्धनने आपली उत्कृष्ट खेळी केली.भालाफेकमध्ये अव्वल स्थान मिळविले. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर त्याची चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय (नॅशनल) ॲथलेटिक स्पर्धेसाठी त्याची निवडत झाली आहे.

हर्षवर्धनच्याधं या यशामागे क्रीडा शिक्षिका श्रीमती विद्या डुबल,पालक सुभाष पाटील,संस्थेचे सचिव प्रताप उर्फ भैय्या माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक बिपीन माने, संचालिका श्रीमती मीनाताई घाग व शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. सविता माने, शाळेचे मुख्याध्यापक शंकर संकपाळ सातत्याने प्रोत्साहन लाभले.
हर्षवर्धनच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शालेय समिती, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी हार्दिक अभिनंदन केरीत,चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेतस शुभेच्छा दिल्या.