मुरगूड मध्ये वृक्षानां बंधू मानून वृक्षरक्षाबंधन

वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांचा दोन तपांपासूनचा उपक्रम; २५० वृक्षांना बांधल्या राख्या

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील वनश्री मोफत रोपवाटिका, महिला निसर्ग मंडळ व मुरगूड शहर निसर्गमित्र मंडळचे संस्थापक वृक्षमित्र प्रवीण सुर्यवंशी यांच्या प्रयत्नातून मुरगूड मध्ये पर्यावरण संवर्धनाचे  कार्य गेले ३० वर्षे सुरू असून त्याचाच एक भाग सन २००३ सालापासून मुरगूड मध्ये वृक्षांना आपले बंधू मानून त्यांचा वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दोन तपांपासून अव्याहतपणे सुरू आहे.  

Advertisements

यावर्षी मुरगुडच्या उपनगराध्यक्षा श्रीमती रेखाताई मांगले नगरसेविका सौ गीता आंगज यांच्या हस्ते येथील सप्तपर्णीच्या वृक्षास राखी बांधून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. माजी नगरसेविका प्रतिभा सुर्यवंशी व महिला मंडळाचे अध्यक्ष सौ नीता सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.   

Advertisements

याप्रसंगी आपल्या मनोगतात वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी म्हणाले, गेली दोन तपे सातत्यपूर्ण सुरू असणाऱ्या या उपक्रमामध्ये मुरगूड मधून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. वृक्ष आपले संरक्षक बंधू असून त्यांच्या मार्फतच आपले जीवन सुखकर बनते ही कृतज्ञतेची भावना लक्षात घेऊन आम्ही २००३ सालापासून वृक्ष रक्षाबंधन हा कार्यक्रम सातत्यपूर्ण सुरू ठेवला आहे .हे उपक्रमाची २४ वे वर्ष आहे. सर्वांनीच वृक्षाप्रती आस्था बाळगावी, वृक्षाचा आदर करावा अशी यावेळी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

    या उपक्रमामध्ये सौ.कल्पना मोहिते, सौ.शोभा देवडकर, सौ.आशा वाडेकर,  सौ.वंदना वाडेकर,सौ.  नंदिनी खैरे, सौ.ज्ञानेश्वरी टिपुगडे,सौ. साक्षी सुर्यवंशी, सौ.वनश्री जाधव, सौ.सरिता हळदकर,सौ.विद्या कुंभार, लता वडार, शालन भारमल,
श्रीमती आनंदी खैरे, कासुबाई चित्रकार, शालन माने, कमल आपटे, पार्वती भोई, सुभाष खैरे, ओंकार पोतदार, मृत्युंजय सुर्यवंशी आदींनी सहभाग दर्शवला.

Advertisements

स्वागत- प्रास्ताविक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले तर आभार ओंकार पोतदार यांनी मानले.

Leave a Comment

error: Content is protected !!