दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयाचा अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांकडून जवानांसाठी राख्या

सिद्धनेर्ली (श्रद्धा पाटील) : व्हन्नूर  ता.कागल येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी “एक राखी जवानांसाठी” हा अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ते आकर्षक,रंगीबेरंगी,मण्यांच्याव कलात्मक राख्या तयार करून देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Advertisements

       कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी जवानांच्या शौर्य, त्याग व राष्ट्रसेवेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. “देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहून सेवा करणाऱ्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे,” असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. तयार केलेल्या राख्यांसोबत शुभेच्छा संदेश व कृतज्ञतेची पत्रेही पाठविण्यात आली.

Advertisements

        या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी व सैनिकांबद्दल आदराची भावना वृद्धिंगत झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. जी. पोवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळते, असे सांगितले.

     कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विभाग प्रमुख बी.जी.बोराटे,सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे परिसरातील पालक व नागरिकांकडूनही कौतुक होत आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!