महागाईचा दणका: १ सप्टेंबरपासून दूध प्रतिलिटर ९ रुपयांनी महागणार!

मुंबई: सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा महागाईची झळ बसणार आहे. साखर, कांदा आणि अंड्यांनंतर आता दुधाचे दरही वाढणार आहेत. ‘मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन’ने (MMPA) १ सप्टेंबरपासून दुधाच्या दरात प्रतिलिटर ९ रुपयांची मोठी वाढ करण्याची घोषणा केली आहे.

Advertisements

या दरवाढीमुळे मुंबईत दुधाचा घाऊक (Wholesale) दर सध्याच्या ९३ रुपये प्रतिलिटर वरून वाढून १०२ रुपये प्रतिलिटर होणार आहे.

Advertisements

दरवाढीचे मुख्य कारण काय ?

‘मुंबई मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन’चे अध्यक्ष चंद्रकुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जोगेश्वरी येथील दिवाण सेंटर हॉलमध्ये पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार:

  • पशूखाद्याच्या दरात २५% वाढ: दुभत्या जनावरांच्या किमतींसोबतच त्यांच्या खाद्याच्या (धान्य, तूर चुन्नी, चणा चुन्नी इत्यादी) दरात २५ टक्क्यांपर्यंत मोठी वाढ झाली आहे.
  • उत्पादन खर्चात वाढ: पशूखाद्य आणि पेंडीच्या किमती वाढल्यामुळे दुग्ध उत्पादकांवर मोठा आर्थिक भार पडत आहे.

वाढत्या उत्पादन खर्चातून दुग्ध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे.

Advertisements

नवीन दर कधीपर्यंत लागू राहणार?

असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, दुधाचे हे नवीन दर १ सप्टेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीसाठी लागू राहतील.

Leave a Comment

error: Content is protected !!