कागल : कागल नगर परिषद कागल अंतर्गत असणाऱ्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर, कागल या शाळेमध्ये मुख्याध्यापक श्री. सागर नदाफ यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्या व आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले. वाढदिवसाचा आनंद विद्यार्थ्यांसोबत शैक्षणिक उपक्रमातून साजरा करण्याचा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.
या कार्यक्रमास माननीय श्री. सम्राट सणगर (अध्यक्ष, गहिनीनाथ समूह) तसेच माननीय श्री. शिवाजी मोरे (सामाजिक कार्यकर्ते) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याबरोबरच सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र देऊन त्यांच्यामध्ये शिस्त, सुरक्षितता व शाळेशी असलेली आपुलकी वाढविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.
मुख्याध्यापक सागर नदाफ यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना ओळखपत्र व शैक्षणिक साहित्य वाटप
Advertisements