सभासदानां १५ टक्के लाभांश
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील श्री. गणेश नागरी सह पतसंस्थेला २०२५ – २६ या अहवाल सालात संस्थेकडे १३२ कोटी ७ लाखांच्या ठेवी तर २ कोटी २९ लाख इतका नफा झाला आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल ६२२ कोटी ५८ लाख इतकी असून संस्थेने सभासदांना १५ % लाभांश दिला असल्याची माहिती सभापती सोमनाथ यरनाळकर यांनी दिली.
मुरगूड येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या संस्थेच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते . सभापती यरनाळकर म्हणाले, संस्थेकडे १३२ कोटी ७ लाखांच्या ठेवी असून १०४ कोटी ५१ लाखांची कर्जे वितरीत केली आहेत. संस्थेचे खेळते भांडवल १५५ कोटी २९ लाख असून ४७ कोटी २९ लाखांची गुंतवणूक केली आहे . तसेच संस्थेला “आदर्श पतसंस्था ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .यावेळी १० वी, १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

अहवाल वाचन कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांनी केले.सभा अत्यंत खेळीमेळीत पार पडली. सभासदांनी सभेतील १ ते १२ विषयांना कोणत्याही प्रकारची हरकत न घेता मंजुरी दिली.
सभेमध्ये जयसिंगराव भोसले,आप्पासो कांबळे,
परशराम डोणे, सुनील मंडलिक, अशोक डवरी या सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. सभापती यरनाळकर व कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांनी सभासदांच्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरे दिली . यावेळी सुनील मंडलिक यांनी संस्थेच्या प्रगती बाबत संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी उपसभापती राजाराम कुडवे, संचालक आनंदराव देवळे, एकनाथ पोतदार, मारुती पाटील, सुखदेव येरुडकर, आनंदा जालिमसर, प्रकाश हावळ, दत्तात्रय कांबळे , सौ.रुपाली शहा, सौ. रेखा भोसले यांच्यासह सभासद, सर्व शाखांचे शाखाधिकार, सर्व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी स्वागत, प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक चेअरमन उदयकुमार शहा यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. सुत्रसंचालन व आभार साताप्पा चौगले यांनी मानले.