मुरगूड (शशी दरेकर) : युथ सर्कल मुरगूडच्या वतीने गेले पन्नास वर्षे सामाजिक व शैक्षणिक, सांस्कृतिक कला, क्रीडा सहकार क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करत आहे, येथील महिलांची, जेष्ठांची व तरुणांची एकजुट पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो. या मंडळांनी केलेले कार्य हे समाजाभिमुख व कौतुकास्पद असेच आहे असे प्रतिपादन नगराध्यक्षा सुहासनिदेवी प्रविणसिंह पाटील यांनी व्यक्त केले त्या गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी मुरगुड नगरपालिका मुरगुडच्या नूतन नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सुहासिनीदेवी पाटील व नगरसेविका सुजाता पुजारी नगरसेवक सत्यजितसिंह पाटील,रंणजीत भारमल,सम्राट मसवेकर विजय मेंडके यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला

विविध स्पर्धेतील बक्षिसांचे निकाल
संगीत खुर्ची स्पर्धा-महिला
१. वंदना विठ्ठल नलवडे
२. सोनाली मंगेश अडसुळे
३. नंदीनी संदीप सारंग
४. भाग्यश्री सागर पुजारी
मुली संगीत खुर्ची
१. राई आप्पासो मेंटकर
२. राधिका तुकाराम पुजारी
३. श्रेया शिवाजी धनगर
४. श्रेया सुरेश पुजार
संगीत खुर्ची स्पर्धाः (पुरुष)
१. अलोक राजेंद्र चव्हाण
२. श्रेयस सातापा तळेकर
३. स्वरूप सागर पुजारी
४. प्रतिक विलास बेळेकर
यावेळी मंडळाचे सदस्य विजय शिंदे यांनी श्रींची मूर्ती तसेच कोल्हापूर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय कसबा बावडा क्लार्क या पदी निवड झाल्याबद्दल सीमा संजय उपलाने यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सुजश्री वंडकर, वासंती पुजारी,आनंदी चव्हाण, शिवानी मेंटकर, सुशिला डेळेकर ,मेघा मेटकर , अमृता वंडकर, सविता डेळेकर, सुवर्णा नलवडे, रोहीणी चव्हाण, महादेव वागवेकर, बळीराम डेळेकर, कृष्णात चव्हाण, संजय डेळेकर, विठ्ठल मेटकर आदींच्या हस्ते बक्षीसांचे वितरण करण्यात आले.
संयोजक राजेंद्र चव्हाण,पांडुरंग पुजारी,योगेश सांरग ,ओंकार वंडकर ,वैभव चव्हाण, शुभम वंडकर ,आक्षय गळपाशे ,प्रसाद मेंटकर , प्रमोद रामाणे , आदीनी केले.
यावेळी महाआरती व धनगरी ओवी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शाहीर संजय मेंटकर माजी नगरसेवक जगन्नाथ पुजारी संदीप पुजारी विठ्ठल मेंटकर आनील दिवटे यांनी पौराणिक ओव्या सादर केल्या.
स्वागत साक्षी रामाणे यांनी केले तर प्रास्ताविक नंदीणी सारंग यांनी केले. सुत्रसंचालन अनुजा वंडकर यांनी तर आभार धनश्री चव्हाण यांनी मानले .