श्री शिवाजीराजे पतसंस्था सभासदांना देणार 14% डिव्हिडंड

पेठवडगाव(सुहास घोदे) : येथील श्री शिवाजी राजे व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी उत्साहाच्या व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या सभेमध्ये अहवाल वाचन करत असताना सभासदांच्या मागणीवरून संस्थेचे चेअरमन श्री अजय दादा थोरात यांनी यावर्षी सभासदांकरिता 14% लाभांश देणार असल्याचे जाहीर केले.

Advertisements

यावेळी संस्थेच्या ठेवीमध्ये तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांची वाढ झाल्याचे त्यांनी जाहीर केले. ही गोष्ट सभासदांचा ग्राहकांचा संस्थेवर असणारा प्रचंड विश्वास दाखवते असे प्रतिपादन त्यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले. तसेच कर्जदारांनी आपली कर्जे वेळेत भरून संस्थेची थकबाकी पर्यायाने कर्जदारावर होणारी कायदेशीर कारवाई टाळून संस्थेत सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.

Advertisements

यावेळी सभेस व्हाईस चेअरमन श्री संजय कदम संचालक श्री बाळासो पाटील, सुरेंद्र जंगम,देवेंद्र राणे,अभिताब सनगर, सतीश ताटे, पुष्पराज भोपळे.तज्ञ संचालक श्री रमेश पाटील उपस्थित होते.
विषय व नोटीस वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री संतोष नांगरे यांनी केले.संस्थे च्या कामकाजाविषयी थोडक्यात आढावा त्यांनी वाचून दाखवला याप्रसंगी पेठ वडगाव चे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर मोहनलाल माळी यांनी संस्थेने केलेले कामकाजाचे कौतुक करताना संचालक मंडळांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचे सर्वांनी कौतुक करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यावेळी समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते भीमराव साठे यांचा व प्रकाश बुचडे यांचा वस्त्रोद्योग भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल  सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. तसेच श्री बलराम पाटील, अनिकेत फडणीस, दीपक गुरव, योगेश हुकेरी व रोहन लडगे यांचा विविध क्षेत्रांमध्ये यश मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Advertisements

सभेच्या कामकाजामध्ये सर्वश्री शरद गुरव, बबलू खाटीक, राजाराम कोळी, सुनील माने, शरद जाधव तसेच उपस्थित सभासदांनी सहभाग नोंदवला या सभेमध्ये जनसुराज्य, ताराराणी आघाडी व युवक क्रांती आघाडीच्या नवनियुक्त नगरसेवक नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला संस्थेच्या सभासदांनी नेहमीच असाच विश्वास संस्थेवर दाखवावा व संस्था प्रगतीपथावर नेण्यास सहकार्य करावे असे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन माननीय श्री अजय श्रीकांत थोरात यांनी केले.

यावेळी उपस्थित पत्रकार बंधूंचा स्वागत व सत्कार करण्यात आला. संस्थेच्या ठेवी 25 कोटीचा टप्पा पार करून गेल्या तसेच कर्जे जवळजवळ 18 कोटी इतकी आहे. चालू वर्षी संस्थेला जवळपास 24 लाख रुपये चा नफा झाले चे संस्थेचे अध्यक्ष श्री अजय थोरात यांनी सांगितले. सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री संतोष नांगरे यांनी केले.

सभेचे कामकाज पार पाडण्यास सर्वश्री संग्राम थोरात हेमंत पाटील अभिजीत शिंदे डॉक्टर रवींद्र जंगम अमोल कदम इत्यादी सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले यावेळी उपस्थित सर्व सभासदांसाठी अल्पोभाराची उत्तम सोय संस्थेने केली होती.सर्व कर्मचारी वर्गाने ही सभा पार पाडणेस परिश्रम घेतले

Leave a Comment

error: Content is protected !!