शेअर्स रकमेचा परतावा देण्यास कटीबद्द : अंबरिष घाटगे

समृद्धी दुध संघाची 1 कोटीची थकीत बीले आदा साके (सागर लोहार): माजी आमदार संजयबाबा घाटगे गटावर प्रमे करणा-या तमाम निष्ठावंत कष्टकरी प्रामाणिक शेतकरी सभासदांनी समृद्धी दुध प्रकल्प उभारणीसाठी शेअर्स खरेदी करून आपले योगदान निष्ठेने दिले आहे. त्यांचे हे योगदान वाया जावू देणार नाही. त्यांना घेतलेल्या शेअर्स रकमेचा परतावा देण्यासाठी आम्ही कटीबद्द आहोत असे प्रतिपादान गोकुळचे … Read more

Advertisements

मुरगूडात शिवप्रेमींच्या वतीने सदाशिवराव मंडलिक यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड तालुका कागल येथील मुख्य बाजारपेठेत शिवभक्त धोंडीराम परीट व शिवप्रेमींच्या वतीने लोकनेते दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या 87 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रारंभी माजी नगरसेवक किरण गवाणकर यांच्या शुभहस्ते मंडलिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी किरण गवाणकर, नगराध्यक्ष राजेखान जमादार, विकी साळोखे, माजी नगरसेवक सुनील रणवरे यांनी मंडलिक यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Advertisements


शिवभक्त धोंडीराम परीट बोलताना म्हणाले सर्वसामान्य जनतेचे आधारवड व हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून खासदार सदाशिवराव मंडलिक यांची समाजात ओळख असल्याचे सांगत त्यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला.

Advertisements

यावेळी नगरसेवक विशाल सूर्यवंशी, बाजीराव गोधडे, अशोक दरेकर, आनंदा मांगले, दत्तात्रय मंडलिक, आनंदा गोरुले, सदानंद मिरजकर, पत्रकार शशी दरेकर, सोमनाथ येरनाळकर, गौरव मोर्चे, अशोकराव साळोखे, विशाल मंडलिक, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत विकी साळोखे यांनी तर आभार अमित दरेकर यांनी मानले.

Advertisements
AD1

कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी तर्फे राम मंदिर येथे करण्यात आली आरती

कागल : कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता बऱ्याच कालावधीनंतर आज मंदिरे भाविकांसाठी दर्शनाकरिता खुली करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. समस्त मानव जातीवर आलेले हे संकट लवकर टळू दे आणि सर्व सामान्यांचे जीवन पूर्वपदावर येऊ दे,अशी मनोभावे प्रार्थना करुन कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टी तर्फे प्रभु श्री राम मंदिर येथे आरती करण्यात आली तसेच कागल चे ग्रामदैवत गहिनीनाथ गैबीपीर दर्गा येथे प्रार्थना करण्यात आली.


यावेळी कागल शहर राष्ट्रवादी काॕग्रेस अध्यक्ष संजय चितारी,उपनगराध्यक्ष विवेक लोटे, नगरसेवक आनंदा पसारे, बाबासो नाईक, गंगाधर शेवडे, नवाज मुश्रीफ, इरफान मुजावर, जावेद नाईक, शाहनुर पखाली, सुरेश शिंदे, बच्चण कांबळे, सोहेल मुजावर, राहुल गाडेकर, निशांत जाधव, राष्ट्रवादी काॕग्रेस पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाघापूर व परिसरातील मंदिरे खुली झाल्याने भाविकांतून समाधान


मडिलगे(जोतीराम पोवार) :


गेली दीड वर्ष बंद असलेली मंदिरे शासन आदेशानुसार आज घटस्थापना दिवशी खुली झाल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे वाघापूर तालुका भुदरगड येथील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री ज्योतिर्लिंगाचे मंदिर खुले झाल्याने ग्रामस्थ तसेच परिसरातील भाविकांतून उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

येथील मंदिर गेले दीड वर्ष कोरणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आल्याने नागपंचमी तसेच दसरा महोत्सव रद्द करावा लागला होता.

नवरात्रीत ज्योतिर्लिंग, विठ्ठल बिरदेव व विठ्ठलाई यांच्या पालखी प्रदक्षिणा बरोबरच जागर या दिवशी भाकणूक ऐकण्यासाठी व गुलाल-खोबरे उजळण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात शासन आदेशानुसार मंदिर खुले झाले असले तरी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार भाविकांना मंदिरात जात असताना मास्कचा वापर बंधनकारक असून सानिटायझरचा वापर तसेच सोशल डिस्टन चे पालन करावे लागणार असल्याचे स्थानिक देवस्थान सल्लागार समितीचे अध्यक्ष अरविंद जठार यांनी गहिनीनाथ समाचारशी बोलताना सांगितले यावेळी उपाध्यक्ष सदाशिवराव दाभोळे , सरपंच दिलीप कुरडे,पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे, सचिव रावसाहेब बरकाळे यांच्यासह देवस्थान समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते

सिद्धनेर्ली येथील महालक्ष्मी दूध संस्थेच्या दसरा ठेव वाटप

पिंपळगाव खुर्द (आण्णाप्पा मगदूम):- येथील श्री महालक्ष्मी दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांना शाहू कारखान्याचे व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते दसरा ठेवीचे वाटप करण्यात आले.यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, शेती बरोबरच दुग्ध पालन व्यवसायातून शेतकऱ्यांना आपली आर्थिक प्रगती साधता येईल. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने जनावरांच्या गोठ्यासाठी कर्ज वाटप योजना चालू असून ज्यांना मोठ्या स्वरूपात … Read more

सौ.दिपाली भरत कतगर स्व .राजे विक्रमसिंह घाटगे “आदर्श शिक्षिका पुरस्काराने” सन्मानित

कागल प्रतिनिधी:स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे “आदर्श शिक्षिका पुरस्कारने”नेर्ली (ता.करवीर) विद्यामंदिरच्या अध्यापिका सौ. दिपाली भरत कतगर सुळकूड (ता.कागल) यांना सन्मानित करण्यात आले. सौ. दिपाली कतगर यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेवून त्यानां प्रदान करणेत आला. राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा आईसाहेब शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते तसेच उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, गोकुळचे माजी … Read more

साकेत अन्नपुर्णा शुगरच्या ऊस ट्रॅक्टर चे पुजन

साके(सागर लोहार): केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ नुकताच मान्यवरांच्या उपस्थीत पार पडला आहे. कारखान्याच्या प्रत्यक्ष गळपासा आता सुरूवात झाली असून कार्यक्षेत्रातील सुमारे १७ गावात कारखान्याच्या ऊसतोडण्या सुरू करण्यात आल्या आहे. त्यानिमित्त कारखान्याला पाठवत असलेल्या ऊस ट्रॅक्टरचे गावोगावी पुजन करून कारखान्याला ऊस पाठविला जात आहे.साके ता.कागल … Read more

कोळवण येथील कृषीकन्येकडून शेतकर्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती

साके(सागर लोहार)- शेतकर्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करूण कमी खर्चात जादा उत्पन्न घेणे काळाची गरज बनली आहे. शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान व मोबाईल अॅप्सची माहिती कृषी महाविद्यालय राजमाची (कर्हाड) येथील सातव्या सत्रातील कृषीकन्या त्रृतूजा पांडूरंग पाटील हिने तनांच्या व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखिवले व मार्गदर्शन केले. यावेळी शेती आधारीत प्रात्यक्षिके, जमीन व्यवस्थापन, पीक … Read more

पत्रकार प्रकाश तिराळेंचा जिल्हा परिषदेतर्फे आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवून गौरव

मुरगूड : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष व दै.सकाळचे मुरगूड येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना जिल्हापरिषदेच्या वतीने सन 2021 सालचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील सैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या एका शानदार कार्यक्रमात जिल्हापरिषदेचा आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार – 2021 (कागल तालुकास्तरीय ) … Read more

सीमाभागातील एस.टी वाहतूक सुरू करा गडहिंग्लज शिवसेनेची मागणी

गडहिंग्लज – धनंजय शेटके सध्या महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असून.महाराष्ट्र राज्यातील शाळा,महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत.गडहिंग्लज हे सीमा भागातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र असून सिमा भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गडहिंग्लज मध्ये येतात.पण सीमा भागातील एस.टी वाहतूक अजून बंदच असून याचा त्रास विद्यार्थी व नागरिकांना होत आहे.तसेच गडहिंग्लज संकेश्वर … Read more

error: Content is protected !!