प्रपंचाला परमार्थाची साथ असेल तर मानवी जीवनाचे सार्थक होते – अनिता बहेनजी

व्हनाळी: वार्ताहर मानवी जीवनात प्रपंचाला परमार्थाची साथ असेल तर मानवी जीवन सुकर होऊन जीवनाचे सार्थक होते व आत्मिक समाधान लाभते असे प्रतिपादन ब्रम्हाकुमारी अनिता बहेनजी यांनी केले.

Advertisements

बाचणी (ता.कागल) येथील ब्रम्हाकुमारीय ईश्वरीय विश्व विद्यालय शाखा बाचणीच्या वतीने आयोजीत “दैवी गुणांच्या व्दारा लक्ष्मीचे आवाहन” या दीपावली निमित्त आयोजीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Advertisements

यावेळी श्री लक्ष्मीचे देवीचे पूजन सौ.नंदा पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पुष्पा पाटील, रोहीणी पाटील, एकनाथ पाटील, निवृत्ती पाटील, अर्चना पाटील,अरूणा पाटील, सुनिता जाधव, शिवाजी सुतार, रामचंद्र जाधव, आनंदा पाटील, बाळासाहेब कातकर, पिंटु जांभळे, नंदा पाटील, श्रीकांत कांबळे आदी भाई, बहेनजी उपस्थित होत्या.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!