सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

एक जानेवारीपासून कामगारांना वेजबोर्डही लागू करणार…. कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ…. सेनापती कापशी दि: १९: सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची एकरकमी एफआरपी २,९६० रुपये देणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. कारखान्याच्या कामगारांना येत्या एक जानेवारीपासून वेजबोर्डही लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम शुभारंभात … Read more

Advertisements

सद्गुरू बाळूमामाचा जन्मसोहळ उत्साहात संपन्न

मडिगले(जोतिराम पोवार) : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा राज्यातील लाखो भाविकभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांचा १२९ वा जन्मकाळ सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. बाळुमामांच्या नावाने चांगभलच्या जयघोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ढोल कैताळाच्या गगनभेदी आवाजात, भंडा-याच्या मुक्तहस्ते उधळणित हा जन्मकाळ सोहळा संपन्न झाला. बाळूमामाच्या जन्म काळ उत्सवासाठी विस्तार … Read more

दाव्याच्या खर्चासाठी कागल शहरातून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेबांना २५ लाखाची देणगी

जनतेच्या प्रेमाबद्दल मंत्री श्री. मुश्रीफ यांनी नागरिकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता…….. कागल, दि. १८:भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधातील दाव्याच्या खर्चासाठी कागल शहरवासीयांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफसाहेब यांना 25 लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली. प्रमुख नेतेमंडळी, कार्यकर्ते व नागरिकांनी आज ही रक्कम मंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांच्याकडे सुपूर्द केली. जनतेच्या या प्रेमाबद्दल मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी … Read more

यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी लाभलेला नेता म्हणजेच खा. सदाशिवराव मंडलिक – डॉ.जयंत कळके

मुरगूड ( शशी दरेकर ) : देशाचे तत्कालीन उपपंतप्रधान,महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी लाभलेला लोकनेता म्हणजे स्व. खा. सदाशिवराव मंडलिक साहेब -होय! जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी जाणीव पूर्वक लक्ष देऊन त्या योजना शेतकरी,कष्टकरी, यांच्यासाठी त्यानी अमलात आणल्या. डोंगराळ भागात शिक्षण संस्था काढून गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय स्व.खा.मंडलिकसाहेबांनी केली आहे. असे प्रतिपादन गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे … Read more

छ .शिवरायांच्या अर्धपुतळ्याची विधिवत उत्तरपूजा

छ .शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीचे काम लवकरच पूर्ण करणार -नगराध्यक्ष राजेखान जमादार ….. मुरगूड ( शशी दरेकर )मुरगूड नगरपालिके समोरील शिवाजी उद्यानात असणाऱ्या छ.शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याच्या ठिकाणी सुमारे एक कोटीचा छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होणार आहे . त्यासाठी उद्यानातील छ .शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा उतरवण्यापूर्वी पुतळ्याची विजयादशमी दिनी विधीवत उत्तरपूजा करण्यात आली . पालिकेसमोरील छ … Read more

जीव ओवाळून टाकावा एवढं प्रेम जनतेने केलं – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागलच्या शाहूनगरमध्ये बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कागल (सचिन नाईक): जीव ओवाळून टाकावा एवढं प्रचंड प्रेम जनतेने आपल्यावर केल आहे, अशा भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या. जनतेच्या या ऋणातून उतराई होण्यापेक्षा सातजन्मी जनतेच्या ऋणात राहणेच पसंत करीन, असेही ते पुढे म्हणाले.      कागल येथे शाहूनगर बेघर वसाहतीमध्ये ७०० बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य व ओळखपत्र वाटप … Read more

कांबळवाडी हे अधिकाऱ्यांचं गाव व्हावं – संपत गायकवाड

राशिवडे(प्रतिनिधी) : शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था, राशिवडे बु, कै. अमर आनंदराव पाटील शिक्षण संस्था आणि मा. खा. सदाशिवराव मंडलिक माध्यमिक विद्यालय, कांबळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कांबळवाडी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. अभ्यास केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सौ. सोनाली पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कै. अमर आनंदराव पाटील यांच्या 29 व्या … Read more

लखीमपुर खेरी हत्याकांड हाच भाजपचा खरा चेहरा

सुधारलेल्या देशात शेती व्यवसायाची हार होत असताना आपला देश शेतीच्या प्रगतीसाठी धडपडताना दिसत आहे. कारण आपल्या देशाची लोकसंख्या प्रचंड मोठी असल्याने देशात खाणारी तोंडे जास्त आहेत. एवढ्या लोकसंख्येला पुरेल इतके धान्य पिकवण्याची क्षमता आपल्या देशातील शेतकर्‍यांनी अनेकदा सिद्ध केली आहे. परंतु अलीकडे देशातील शेतकरी अनेक संकटांनी घायाळ झाला आहे. तो निराश झाला आहे. आपले कुटुंब … Read more

सिद्धनेर्ली येथे नदी पुलावर ट्रक पलटी

सिद्धनेर्ली(लक्ष्मण पाटील): सिद्धनेर्ली ता. कागल येथे निढोरी राज्यमार्गावर बामणी व सिद्धनेर्ली या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या दूधगंगा नदीच्या पुलावर धान्याने भरलेली ट्रक पलटी झाला. या ट्रकने दुधगंगा नदीच्या पूलावरील सुमारे शंभर फूट इतका लोखंडी संरक्षक कठडा तोडला आहे.रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर काही वेळ या मार्गावरून वाहतूक बंद होती. मात्र काही नागरिकांनी हा … Read more

कागल नगरीतील श्री गहिनीनाथ हजरत गैबी पीर उरूस 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर अखेर शासन मार्गदर्शनानंतर साजरा होणार

पांढरे निशाण उभारण्याचा कार्यक्रम संपन्न कागल(सचिन नाईक) : सालाबाद प्रमाणे विजयादशमी दसरा मुहूर्तावर शुक्रवार दिनांक 15 ऑक्टोंबर 2021 रोजी श्री. गहिनीनाथ गैबीपीर दर्ग्यामध्ये पवित्र पांढरे निशाण उभारण्याचा कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी उरूस कमिटी अध्यक्ष शिवगोंड पाटील उरूस कमिटी कार्यक्रम अध्यक्ष सौ माणिक रमेश माळी तसेच सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी शासकीय अधिकारी सर्व … Read more

error: Content is protected !!