बातमी

राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धत जान्हवी सावर्डेकरने पटकावली ३ सुवर्ण,१ कास्य पदके

अमेरिका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धसाठी भारतीय संघात निवड

मुरगूड (शशी दरेकर) :
गोवा येथे ज्युनियर, सिनियर (पुरुष व महिला) बेंचप्रेस (इक्युब अँण्ड अनइक्युब) अजिंक्यपद स्पर्धत येथील जान्हवी जगदीश सावर्डेकर हिने तब्बल ३ सुवर्ण , व १ कास्यपदक पटकावले आहे.तिची अमेरिका येथे डिसेंबरमध्ये
होणाऱ्या जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
गोवा येथे झालेल्या ज्युनियर , सिनीयर राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग बेंचप्रेस (इक्युब अँण्ड अनइक्युब) अजिंक्यपद स्पर्धत जान्हवी सावर्डेकर हिने ७६ किलो ज्युनियर गटात इक्युब प्रकारात (किट परिधान करून ) ११५ किलो तर अनइक्युब प्रकारात ( किट न घालता ‘क्लासिक ‘) ९० किलो वजन उचलत दोन सुवर्णपदके पटकावली आहेत . तिने या गटात प्रतिस्पर्ध्यांपेक्षा १० व ८ किलो जादा वजन उचलले आहे .

तर सिनीयर गटात इक्युब प्रकारात ( किट परिधान करून ) १२० किलो वजन उचलुन सुवर्णपदक अशी तीन सुवर्णपदके पटकावली आहेत. तिने या गटात प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तब्बल १० किलो जादा वजन उचलले आहे . तसेच तिने सिनीयर गटात अनइक्युब प्रकारात ( किट न घालता ‘क्लासिक ‘) ८२ किलो वजन उचलले . यामुळे तिला कास्य पदकावर समाधान मानावे लागले . तिच्या या कामगिरीमुळे अमेरिका येथे होणाऱ्या जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धसाठी निवड झाली .
जान्हवी सावर्डेकर हिने यापुर्वी महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धातुन ज्युनियर, सिनीयर गटात सुवर्ण व रौप्यपदके पटकावली आहेत. तसेच अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पॉवरलिफ्टींग अजिक्यपद स्पर्धत ७९ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले आहे . राष्ट्रीय व राज्य स्पर्धत १० सुवर्ण, ५ रौप्य व ३ कांस्यपदके पटकावली आहेत .तिला प्रशिक्षक विजय कांबळे यांचे मार्गदर्शन तर वडील जगदीश सावर्डेकर, भाऊ मयुर सावर्डेकर यांचे प्रोत्साहन लाभले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *