
अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर ने होणार पुष्पवृष्टी ; विविध कार्यक्रमाचे आयोजन
मुरगूड ( शशी दरेकर ) : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सहा जूनला राज्याभिषेकदिनी मुरगूड मध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याभिषेक दिनांचे औचित्य साधून येथे नव्यानेच लोकार्पण करण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत शिवप्रेमीनी दिली. संयुक्त गावभाग मुरगूड यांच्यावतीने या भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पाच जून रोजी संध्याकाळी आठ वाजता जय भवानी गोंधळ ग्रुप कोल्हापूर व समस्त गोंधळी समाज मुरगूड यांच्यावतीने भवानी गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा जून रोजी सकाळी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिषेक घालण्यात येणार असून-दुपारी तीन वाजता या पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
शिवराज्याभिषेक दिनी दुपारी दोन वाजता हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी चार वाजता अंबाबाई मंदिर मुरगूड इथून भव्य दिव्य सजीव देखाव्यांची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत 10 अश्वासह शुरमावळे, पारंपरिक वेशभूषा, मर्दानी खेळ, महिला लेझीम पथक, धनगरी ढोल व पारंपारिक ढोल पथक पुणे व मुरगूड व परिसरातील अनेक युवक आपल्या सजीव देखाव्यासह सहभागी होणार आहेत. अंबाबाई मंदिरापासून निघालेली ही भव्य दिव्य शोभायात्रा मुरगूड नाका नंबर 1 याठिकाणी समाप्त होणार आहे.
ह. भ .प.डाॅ.श्रीकृष्ण देशमुख , ग्रामविकास मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ खासदार संजय मंडलिक, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पटील, बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह पाटील, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तरुणाईला आकर्षित करणारा अनिल पाटील साऊंड कोल्हापूर यांचा लेसर शो संध्याकाळी सात वाजता आयोजित केला आहे. राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण मुरगूड वासिय आपल्या दारामध्ये भगव्या ध्वजाची गुढी उभा करणार आहेत .
या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके , माजी उपनगराध्यक्ष संतोष वंडकर, माजी उप नगराध्यक्ष दगडू शेणवी, मा.नगराध्यक्ष पांडुरंग भाट , मा.नगरसेवक जगन्नाथ पुजारी, युवराज सुर्यवंशी, डॉ.सुनील चौगले, संजय मोरबाळे, राजू आमते, युवराज सुर्यवंशी, नगरसेवक विशाल सुर्यवंशी, अमर सणगर, डॉ अनिल शिंदे, सुशांत मांगोरे, पांडुरंग मगदूम ,बाळासो चव्हाण, निलेश चौगले, समाधान पवार, गणेश तोडकर,पंकज नेसरिकर, प्रमोद रामाणे. -शिवप्रेमी तसेच मुरगूड वासिय- मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.