मुरगूडमध्ये ” आषाढी एकादशी ” भक्तीमय व उत्साहात साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड शहरामध्ये आषाढी एकादशीनिमित्य कुंभारगल्ली येथिल विठ्ठल मंदीरामध्ये तसेच संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज विठ्ठल मंदीर येथे विठुरायांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी मुरगूड येथिल कुंभारगल्ली विठ्ठल मंदीरातून दिंडी शहर प्रदक्षिणासाठी बाहेर पडली . सर्व मुख्य मार्गावरून दिंडी पुन्हा विठ्ठल मंदीरात आली. शहरामध्ये सर्वच ठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात … Read more

प्राथमिक शिक्षकांना संजयबाबा घाटगें चे पाठबळ : आयलू देसा

व्हनाळी येथे शाहू आघाडीचे नुतन संचालक घाटगेंच्या भेटीला व्हनाळी(सागर लोहार): माजी आमदार संजयबाबा घाटगे व जि. प. चे माजी शिक्षण सभापती अंबरिषसिंह घाटगे यांची शिक्षण आणि शिक्षकाबद्दल असणारी असता व शिक्षकांना दिलेले भक्कम पाठबळ यामुळेच प्राथमिक शिक्षक बॅंकेध्ये परिवर्तन घडू शकले असे प्रतिपादन सर पिराजीराव शिक्षक पतपेढी कागलचे मा.चेअरमन व शिक्षक नेते मुख्य़ाध्य़ापक आयलु देसा … Read more

शालेय समितीच्या अध्यक्षपदी सुभाष चौगले

व्हनाळी(सागर लोहार) : साके ता.कागल येथील विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षपदी संजयबाबा घाटगे गटाचे सुभाष जयसिंग चौगले यांची व उपाध्यक्षपदी सौ.सरिता संजय निऊंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक भानूदास पोवार होते. सदस्यपदी शरद पाटील, अनिल बाचणकर, संभाजी गुरव, संदिप पाटील, सौ. तेजस्विणी पाटील, वर्षाराणी घराळ, मिनाक्षी कांबळे, … Read more

मुरगूड नगरपरिषद निवडणूक दुरंगी की तिरंगी याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक दि-१८ ऑगस्ट २०२२ रोजी होत आहे .२०१६ साली झालेल्या निवडणुकीत पाटील गटाची छ . शिवाजी महाराज विकास आघाडी व माजी मंत्री मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर झालेल्या लढतीत खास. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वा खाली शिवसेनेने थेट नगराध्यक्ष पदासह १७ पैकी १४ जागा जिंकत निर्वीवाद वर्चस्व … Read more

शालेय पोषण आहारातील चटणी निकृष्ट दर्जाची

लहान मुलांच्या आरोग्याशी खेळखंडोबा; पुरवठा केलेले अन्न साहित्य निकृष्ट दर्जाचे कागल : कागल परिसरातील काही शाळेतील दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात वाढत्या मिठाने अन्न खारट झाले आहे. या जेवणात वापरण्यात येणाऱ्या चटणी मध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असल्याने अन्न खारट होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. यातून लहान मुलांच्या आरोग्याशी खेळखंडोबा होत आहे. तसेच यासाठी पुरवठादार व … Read more

सर्व्हर डाऊनमुळे अनेक जण मुकले अग्निपथ योजनेतील सहभाग

कागल/ विक्रांत कोरे : सर्व्हर डाऊन ,वेळ संपली यामुळे अग्निपथ योजनेअंतर्गत ऑनलाइन फॉर्म भरणाऱ्या तरुणांचा अखेर भ्रमनिराश झाला. पुन्हा तारीख व वेळ वाढवून द्यावी अशी मागणी तरुणांच्याकडून केली जात आहे. दिवसेंदिवस नोकरीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे रोजगार उपलब्ध नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. तरुण वर्ग नोकरीच्या शोधात भरकडतो आहे. नोकरी नसल्याने छोकरीचाही प्रश्न दिवसेंदिवस … Read more

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया – आमदार हसन मुश्रीफ

आजरा, दि.०५: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवूया, असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. भविष्यात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर एकचा पक्ष असेल, असेही ते म्हणाले. आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष स्तरावरून ते बोलत होते. आजरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात भाषणात आमदार श्री. मुश्रीफ पुढे … Read more

निढोरीकरांनी घेतली विधवा सन्मान शपथ

मुरगूड ( शशी दरेकर ) : निढोरी ता-कागल येथील आनंदा लक्ष्मण कांबळे यांचे अल्पशा आजाराने दुःखत निधन झाले. या दुर्देवी निधनाने विधवा झालेल्या त्यांच्या पत्नी उज्ज्वला आनंदा कांबळे यांच्या कुटुंबियांनी शाश्वत विकास चळवळीचे प्रणेते प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार व विकास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विधवा अवमान प्रथा रोखण्याच्या निर्णय घेतला. आनंदा कांबळे यांच्या शोकसभेत या निर्णयाचे … Read more

मुरगूडच्या राजर्षी शाहू पतसंस्थेच्या चेअरमनपदी दत्तात्रय सोनाळकर तर व्हा . चेअरमनपदी रविंद्र ढेरे

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्साकडे वाटचाल करणारी आणि स्वर्गीय खास . सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या कृपा आशिर्वादाने व मान. खासदार संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मुरगूड या संस्थेच्या चेअरमनपदी श्री. दत्तात्रय तु . सोनाळकर व व्हा . चेअरमनपदी श्री. रविंद्र … Read more

कागल शहर आणि परिसरातील वीज बिल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल संभाजी ब्रिगेडच्या वतीने तक्रार अर्ज

कागल (प्रतिनिधी) : कागल एम एस ई बी कार्यालय आणि परिसरातील वीज बिल वसुली करणारे कर्मचारी वसुली करत असताना सर्वसामान्य लोकांना धमकावणे, अरेरावी करणे, उद्धट बोलणे असे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले आहे तशा तक्रारी संभाजी ब्रिगेड कडे दाखल झालेल्या आहेत. तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता वीज कनेक्शन कट केले जाते यासह अन्य इतर … Read more

error: Content is protected !!