बातमी

मुरगूड नगरपरिषद निवडणूक दुरंगी की तिरंगी याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक दि-१८ ऑगस्ट २०२२ रोजी होत आहे .२०१६ साली झालेल्या निवडणुकीत पाटील गटाची छ . शिवाजी महाराज विकास आघाडी व माजी मंत्री मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर झालेल्या लढतीत खास. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वा खाली शिवसेनेने थेट नगराध्यक्ष पदासह १७ पैकी १४ जागा जिंकत निर्वीवाद वर्चस्व मिळविले होते.

दुरंगी की तिरंगी

निवडणूकीनंतर मुरगूडकर पाटील बंधुत उभी फूट झाली. गोकूळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनी राजे समरजितसिंह घाटगे यांचे नेतृत्व स्विकारून भाजपची कास धरली तर बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे .त्यामुळे यावेळची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी होणार याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले असुन धाकधुकही वाढली आहे.

मुरगुडला १९२० साली नगरपालिकेचा दर्जा मिळाल्यावर शहराच्या विकास पर्वाला सुरुवात झाली . १९२० ते १९४७ या २७ वर्षाच्या काळात येथे कोल्हापूर संस्थानाच्या कागल जहागिरीचा अंमल होता .त्यांच्यामार्फतच कारभार चालवला जात असे .संस्थांनाचे प्रमुख प्रतिनिधी या नात्याने नगर प्रमुखाची निवड करत. तोच नगरीचा नगराध्यक्ष असे १९४९ साली देशातील संस्थाने खालसा झाली आणि लोकनियुक्त निवडणुकांना प्रारंभ झाला. त्यातुनच १ मार्च १९४९ ला विठ्ठलराव हरीभाऊ पाटील यांच्या रूपाने मुरगूडनगरीला पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष मिळाले.

मुरगूड नगरपरिषदेत १९४९ ते २०२२ या ७३ वर्षात विश्वनाथराव पाटील ,प्रवीणसिंह पाटील गटास ३८ वर्ष , सदाशिवराव मंडलिक, खा . संजय मंडलिक यांच्या गटास २२ वर्ष सत्ता मिळाली आहे तर ४ .३ वर्ष प्रशासकाची कारकीर्द राहिली आहे. सर्वाधिक नगराध्यक्ष पद विश्वनाथराव पाटील यांना पालिकेत ओबीसी प्रवर्गातून पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान चंद्रकांत वाडेकर यांना ओबीसी पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्याचा मान सौ शुभांगी किरण गवाणकर यांना , पहिल्या मागासवर्गीय नगराध्यक्षा होण्याचा मान सौं . फुलाबाई मारूती कांबळे यांना , सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सौ. माया चौगले यांना तर थेट नगराध्यक्ष होण्याचा मान प्रवीणसिंह पाटील यांना तसेच मुस्लीम समाजाचा थेट नगराध्यक्ष होण्याची संधी राजेखान जमादार यांना मिळाली आहे.

मुरगूड नगर परिषदेचा नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असुन दहा प्रभागातुन २० नगरसेवक निवडून द्यायचे आहेत . तर दोन सदस्य स्वीकृत असणार आहेत .२०११च्या जणगनणेनुसार सुमारे ९५०० मतदारसंख्या असणार आहे. प्रभाग आरक्षणानुसार चार, नऊ व दहा अनुसुचित जाती साठी आरक्षित आहेत . पालिकेत सर्वसाधारण महिला – ८ सर्वसाधारण पुरुष – ८, अनुसुचित जाती महिला – २ व अनुसुचित जाती पुरुष-१ निवडून द्यायचे आहेत.

अर्ज माघारी घेण्याचा दिवस ४ ऑगस्ट असून या दिवसापर्यंत निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे . खा . मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने गत निवडणूकीत भरघोस यश संपादन केले असून शहरात केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा सत्ता संपादन करण्यासाठी सज्ज झाला आहे . या निवडणूकीत मंडलिक गटाबरोबर मुश्रीफ यांचा राष्ट्रवादी पक्ष हातमिळवणी करणार की स्वतंत्र लढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे . गोकूळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील , राजे समरजितसिंह घाटगे गट कोणती भूमिका घेणार यावरच निवडणूक दुरंगी की तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *