व्हनाळी(सागर लोहार) : साके ता.कागल येथील विद्या मंदिर प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीच्या अध्यक्षपदी संजयबाबा घाटगे गटाचे सुभाष जयसिंग चौगले यांची व उपाध्यक्षपदी सौ.सरिता संजय निऊंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक भानूदास पोवार होते. सदस्यपदी शरद पाटील, अनिल बाचणकर, संभाजी गुरव, संदिप पाटील, सौ. तेजस्विणी पाटील, वर्षाराणी घराळ, मिनाक्षी कांबळे, सुरेखा निऊंगरे यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी प्रकाश मगदूम,दतात्रय पाटील, विजय पाटील उपस्थीत होते.