मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल सुवर्णमहोत्साकडे वाटचाल करणारी आणि स्वर्गीय खास . सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या कृपा आशिर्वादाने व मान. खासदार संजयदादा मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्या. मुरगूड या संस्थेच्या चेअरमनपदी श्री. दत्तात्रय तु . सोनाळकर व व्हा . चेअरमनपदी श्री. रविंद्र ग. ढेरे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली.
निवडीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहा. निबंधक श्री. अमर शिंदे साहेब उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालक मंडळ पुढीलप्रमाणे युवानेते विरेंद्र सं . मंडलीक, नेताजी य. पाटील, रामचंद्र अ . भोपळे , प्रदिप कृ . चव्हाण , नारायण ग . मुसळे , पांडूरंग कृ. भाट, दतात्रय चं . भोई , सौ .वैशाली सं . मंडलीक , सौ . सविता ता .कळांद्रे आदी संचालक उपस्थित होते.
यावेळी मा . नामदेवराव मेंडके , प्रा . संभाजी आंगज , सुनिल मंडलीक हजर होते. याप्रसंगी व्यवस्थापक श्री .डी.एन्. पाटील व सर्व शाखांचे शाखाधिकारी व सेवक उपस्थित होते . शेवटी संचालक श्री .एन्. वाय . पाटील यानीं आभार मानले .