बातमी

साके येथे महिला दिन उत्सहात

व्हनाळी(सागर लोहार) : महिला दिन हा दिवस जागतिक स्तरावर दर वर्षी ८ मार्च रोजी महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. या महिला दिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर साके प्राथमिक शाळा व कै.सौ.सुभद्रामाता हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.

प्राथमिक शाळेत सावित्रीबाईं फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ.विद्या पोवार यांच्या हस्ते, श्रुती पाटील ,भक्ती निऊंगरे, वैष्णवी गुरव,स्वरा लोहार, वेदिका कोराणे, शर्वरी पाटील यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून भव्य लेझीम प्रात्यक्षिक साजरे केले. यावेळी विजय पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.

कार्यक्रमास शाळेचे प्र. मुख्याध्यापक भानुदास पोवार, नामदेव पाटील,संभाजी आसबे, बाळासाहेब कवडे, प्रकाश मगदूम आदी उपस्थित होते. स्वागत दत्तात्रय पाटील यांनी केले आभार धनाजी माने यांनी मानले. कै. सौ. सुभद्रामाता माध्यमिक विद्यालय साके येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन वेदवती दामले यांच्या हस्ते तनुजा लोहार, अस्मिता ससे, प्रणाली चौगले, अंकिता सातुसे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मुख्याध्यापक बी.डी.हाळदकर, व्ही.ए. राऊत,पी.एच.पाटील, तानाजी सामंत आदी उपस्थित होते. स्वागत डि.एस.पाटील यांनी केले आभार टि.व्ही.पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *