बातमी

मुरगूडला म्हाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जय्यत तयारी – यात्रा कमिटीची माहिती

मुरगूड ( शशी दरेकर ) :  सुमारे पंधरा ते सोळा वर्षानंतर मुरगूडची म्हाई २ मार्चला जोरदार होत आहे.या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीने सर्व पातळीवर तयारी केली असून बाहेर गावाहून येणाऱ्या पै – पाहुणे, मित्रमंडळींना अंबाबाईचे देवदर्शन सुलभ पध्दतीने व्हावे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जय्यत तयारी केली असल्याची माहिती यात्रा कमिटीने पत्रकार परिषदेत दिली.

येथील ग्रामदैवत अंबाबाई देवालयाच्या मंदिराचे बांधकाम गेली काही वर्षे सुरू असल्यामुळे पंधरा ते सोळा वर्षात मुरगूडची म्हाई झाली नाही.गेल्यावर्षी मंदिर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर यंदा  मोठ्या प्रमाणावर यात्रा (म्हाई) होणार आहे. शुक्रवारी ता.१ मार्चला जागर, शनिवार पासून  (ता.२) गोड्या व खाऱ्या म्हाईची रेलचेल पुढे एक दोन दिवस  असणार आहे.हे लक्षात घेवून शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व पै पाहूणे, मित्रमंडळी यांना संबंधित पाहुण्यांच्या घरी विना अडथळा जाता यावे, याकरिता यात्रा काळात शहरातील वाहतूकीवर कडक निर्बंध लावले आहेत. अंबाबाई मंदिर परिसरात वाहने,खेळणी,पुजेच्या साहित्याची दुकाने यांना बंदी घालण्यात आली असून ही सर्व दुकाने गाव तलावाच्या सभोवताली असणार आहेत.

केवळ पायी चालत जावूनच भाविकांना दर्शन घेता येणार आहे. वाहतूकीच्या बाबतीत पुढील प्रमाणे पार्किंग ठिकाणी असणार आहेत. यामध्ये मुदाळतिट्टा मार्गे येणारी वाहने ही गाव भागात जायचे असल्यास पेट्रोल पंपाजवळील रस्त्यावरुन मराठी शाळा नं.१ याठिकाणच्या पार्किंग मध्ये थांबतील, तर भडगावकडून येणारी व बाजारपेठेत जाणारी सर्व वाहने दत्तप्रसाद हॉल येथील पार्किंगमध्ये थांबतील. निपाणीकडून येणारी सर्व वाहने जनावर बाजारमधील पार्किंगमध्ये थांबणार आहेत.कापशीच्या दिशेने येणारी वाहने शिवराज विद्यालयाच्या मैदानावर थाबतील.

वाघापूर मार्गे येणारी वाहतूक दत्त मंदिरच्या पार्किंग ठिकाणी थांबणार आहेत तर चिमगांव,बोळावीकडून येणारी सर्व वाहनांची पार्किंग व्यवस्था भुत्ते हॉल,गुरव कॉलनी आणि पँव्हेलियनमध्ये  करण्यात आली आहे.मुख्य बाजारपेठेचा रोड वाहतूकीस बंद असणार आहे.तर नाका नं.१ येथून शहरात प्रवेश करण्यासाठी सरपिराजी रोड खुला ठेवण्यात आला आहे.तर शहरातून बाहेर पडण्यासाठी जवाहर रोड आहे.हे मार्ग वन वे असणार आहेत.शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोठा कडक-पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे.

One Reply to “मुरगूडला म्हाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जय्यत तयारी – यात्रा कमिटीची माहिती

  1. I just could not depart your web site prior to suggesting that I really loved the usual info an individual supply in your visitors Is gonna be back regularly to check up on new posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *