एन.डी.गोंधळी यांना “आदर्श अधिकारी पुरस्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगुड तालुका कागल येथील दुय्यम निबंधक श्रेणी,१ कार्यालयाचे दुय्यम निबंधक एन.डी. गोंधळी यांना महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल व वन विभाग,जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ‘आदर्श अधिकारी पुरस्कार’ देवून गौरवण्यात आले. राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे अनन्य साधारण महत्व असून ते लक्षात घेवून १ ऑगस्ट या महसूल दिनी कायदा व सुव्यवस्था,नैसर्गिक … Read more

श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी

कोल्हापूर, दि.3 : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दि. 3 व 4 ऑगस्ट या कालावधीत श्री क्षेत्र चोपडाई देवी श्रावण षष्ठी यात्रा होत आहे.  यात्रा कालावधीत जोतिबा डोंगरावर येणाऱ्या मोटार वाहनांची संख्या तसेच पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटर वाहनांचे पार्कींग होऊन वाहतूकीची समस्या निर्माण होऊ शकते. भाविकांची सुरक्षा … Read more

ब्लॅक ॲस्ट्रोलार्प जातीच्या पिल्लांसाठी संपर्क करा

कोल्हापूर, दि. 3 : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र प्रक्षेत्रामार्फत दर आठवड्याला ब्लॅक ऑस्ट्रॅलार्प जातीचे एक दिवशीय पिल्ले विक्री केली जाते. या एक दिवशीय पिल्लांची किंमत रुपये 20 प्रति नग असून 100 पिल्लांसाठीच्या चिकबॉक्सची किंमत रक्कम रुपये 50 आहे. तसेच उबवणुकीची अंडी उपलब्ध असून त्याचा दर रक्कम रुपये 11 प्रति नग प्रमाणे आहे. तरी अधिक माहितीसाठी … Read more

कुक्कूटपालन प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 3 : मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र प्रक्षेत्रामार्फत दर महिन्याच्या 1 तारखेपासून 30 दिवसांचे कुक्कूटपालन प्रशिक्षण आयोजित केले जाते. प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षणार्थी फी रुपये 200 इतकी असून प्रशिक्षणासाठी इच्छुक व्यक्तींनी दर महिन्याच्या 25 ते 30 तारखेपर्यंत सहायक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन मध्यवर्ती अंडी … Read more

दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करावेत – जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे

कोल्हापूर : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शालांत पूर्व शिष्यवृत्ती, शालांत परिक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहेत. शाळा, महाविद्यालयांनी, पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scholarship.gov.in वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी खालील मुदतीत अर्ज करावेत-  … Read more

राधानगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रथम वर्गाकरिता प्रवेश नोंदणी सुरु

कोल्हापूर, दि. 3 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह राधानगरी, ता. राधानगरी येथील वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती/जमाती, अनाथ, अपंग विद्यार्थ्यांसाठी प्रवेश नोंदणी सुरु आहे. माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन, महाविद्यालयीन तसेच व्यावसायिक पदवी, डिप्लोमा या प्रथम वर्गाकरिता प्रवेश नोंदणी ऑनलाईन  www.apalesarkar.gov.in या संकेतस्थळावर व ऑफलाईन अर्ज वसतिगृहाच्या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहाच्या … Read more

दीनदयाल स्पर्श योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

कोल्हापूर, दि. 3 : टपाल खात्याकडून विद्यार्थ्यांच्या छंदाला चालना देण्यासह त्यांना इतिहासाची माहिती करून देण्यासाठी ”दीन दयाल स्पर्श योजना” योजना राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन कोल्हापूर डाकघर विभागाचे अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी केले आहे. ”दीन दयाल स्पर्श योजनेची माहिती- फिलॅटेली एक छंद म्हणून जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी … Read more

चांगभलंच्या गजरात वाघापूरात नागपंचमी यात्रा भक्तीभावाने साजरी

मडिलगे (जोतीराम पोवार) : महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाघापूर तालुका भुदरगड येथील ज्योतिर्लिंगाची नागपंचमी यात्रा चांगभलंच्या गजरात मौठ्या उत्साहात व भक्तीभावाने पार पडली. पहाटे पाच वाजता आमदार प्रकाश आबिटकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या हस्ते पूजा अभिषेक पार पडल्यानंतर महाआरती करण्यात आली .यावेळी देवस्थान समितीच्या वतीने पोलीस पाटील दत्तात्रय घाटगे यांच्या हस्ते … Read more

कागल तालुक्यातून 1 लाख शिवसैनिकांची नोंदणी करणार – अंबरिषसिंह घाटगे

25 हजार शिवसैनिक सभासद नोंदणी फॉर्म युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंकडे सुपूर्द साके(सागर लोहार) : कोल्हापूर जिल्हातील दोन खासदार शिवसेनेतून बंडखोर शिंदे गटात गेले असले तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाशी आम्ही एकनिष्ठ असून माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांसह पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत खंबीरपणे राहणार आहे. पहिल्या टप्यात 25 हजार शिवसैनिकांची नोंदणी … Read more

महसूल विभाग शासनाचा कणा – मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : महसूल विभागाचा खुप जूना इतिहास आहे. दिवसेंदिवस महसूल विभागाची रचना बदलत चालली आहे. महसूल विभागाचे महत्व ठिकवून ठेवले पाहिजे. सर्व क्षेत्रात काम करणारा महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महसूल … Read more

error: Content is protected !!