ताज्या घडामोडी

श्रावण षष्ठी यात्रा कालावधीत वाहतूक नियमन आदेश जारी

कोल्हापूर, दि.3 : श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथे दि. 3 व 4 ऑगस्ट या कालावधीत श्री क्षेत्र चोपडाई देवी श्रावण षष्ठी यात्रा होत आहे.  यात्रा कालावधीत जोतिबा डोंगरावर येणाऱ्या मोटार वाहनांची संख्या तसेच पार्किंगच्या जागेची उपलब्धता आणि भौगोलिक परिस्थिती या पार्श्वभूमीवर रहदारीच्या प्रमुख मार्गावर मोटर वाहनांचे पार्कींग होऊन वाहतूकीची समस्या निर्माण होऊ शकते.

भाविकांची सुरक्षा व मोटार वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिनांक 3 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यापासून 4 ऑगस्ट  रोजी यात्रा संपेपर्यंत वाहतूक नियमन आदेश जारी केला आहे.

जुने आंब्याचे झाड, दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते प्रवासी टोल नाक्याजवळील नवीन एस.टी.बसस्थानक ते  पी.डब्ल्यू.डी. रेस्ट हाऊस वाडी रत्नागिरी ते यमाई मंदिर कॉर्नर ते गिरोली घाट या दरम्यानच्या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व पार्कींग करण्यास मनाई करण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *