बातमी

जीव ओवाळून टाकावा एवढं प्रेम जनतेने केलं – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कागलच्या शाहूनगरमध्ये बांधकाम कामगारांना साहित्य वाटप

कागल (सचिन नाईक): जीव ओवाळून टाकावा एवढं प्रचंड प्रेम जनतेने आपल्यावर केल आहे, अशा भावना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केल्या. जनतेच्या या ऋणातून उतराई होण्यापेक्षा सातजन्मी जनतेच्या ऋणात राहणेच पसंत करीन, असेही ते पुढे म्हणाले.      
कागल येथे शाहूनगर बेघर वसाहतीमध्ये ७०० बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्य व ओळखपत्र वाटप कार्यक्रमात श्री. मुश्फरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी होते.

    
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, याआधी कामगार मंत्री असताना आपण बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी मंडळाची स्थापना केली. आज या मंडळाकडे १२ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. कामगारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे कल्याण करण्यासाठीचा हा न आटणारा समुद्र आहे, असेही ते म्हणाले. लवकरच शेतमजुरांसह रिक्षाचालक, ट्रकचालक, टेम्पोचालक, एसटीचालक तसेच यंत्रमाग कामगारांचेही कल्याणकारी मंडळ स्थापन करणार असल्याचे सांगतानाच ते पुढे म्हणाले, बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्यासाठीही माझे प्रयत्न सुरू आहेत.
      
अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी म्हणाले, राजसत्ता ही गोरगरिबांच्या कल्याणासाठी कशी राबवायची, याचा परिपाठच मंत्री श्री. मुश्रीफ यांनी घालून दिलेला आहे. त्यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या प्रत्येक खात्यात त्यांनी सामान्य माणूस शोधला व त्याचा सर्वांगीण विकास केला.          
       
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी गेल्या दोन वर्षांत कागलला तब्बल ५५  कोटी रुपयांचा विकासनिधी आणून दिला आहे.
          
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी राबविलेल्या योजनांचे अनुकरण देशातील इतर राज्यांनीही करावे एवढे लौकिकास्पद काम आहे.         
      
पत्रकार अतुल जोशी म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रीपदाची पुण्याई गोरगरिबांच्या दारात पोहोचवली. मंत्रिपदाची जीजी खाती त्यांना मिळाली, त्या खात्याचे जनतेसाठी त्यांनी सोनं केलं. कोणतेही कारण, परिस्थिती अथवा संकट असो, त्यावर ते मात करणारच हे समीकरणच बनले आहे.    


      

आयुष्यभर हमाली करणार…..
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, सेवेतून सत्ता मिळाल्यामुळे  मंत्रिपदाच्या प्रत्येक खात्यात गरीब माणूस शोधला. जनतेनेही मला भरभरून दिले आहे. या कृतज्ञतेच्या भावनेतूनच गोरगरीब जनतेची हमाली आयुष्यभर करणार, असेही ते म्हणाले.
      


निवडणुका आणि समाजकार्य…..
स्वागतपर भाषणात प्रवीण सोनुले म्हणाले, मंत्री श्री. मुश्रीफ यांनी गोरगरिबांच्या सेवेच्या योजना व विकास कागल शहरात घरोघरी पोहोचविला आहे. अशा परिस्थितीत भाजपचे कार्यकर्ते गल्लोगल्ली आणि प्रभागातून फिरायला लागले की समजायचे कोणत्यातरी निवडणुका जवळ आल्या आहेत आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फिरायला लागले की समजायचे कोणती तरी गोरगरिबांच्या सेवीची योजना आलेली आहे.

व्यासपीठावर नगराध्यक्ष सौ. माणिक माळी, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, नगरसेवक आनंदराव पसारे, नगरसेवक नूतन गाडेकर, नगरसेवक नितीन दिंडे, नगरसेविका सौ. मंगल गुरव, नगरसेविका सौ. जयश्री शेवडे, नगरसेविका सौ. माधवी मोरबाळे, संजय चितारी, महेश गाडेकर, सौ. संगीता गाडेकर, शहनाज आत्ता,  सौ. बेबीताई घाटगे, ॲड. संग्राम गुरव, बाबासो नाईक, शिरीष बारवाडे, रंजना सनगर, बेबीताई गाडेकर, पद्मजा भालबर, भारत मोरे, गंगाराम शेवडे आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत प्रवीण सोनुले यांनी केले. प्रास्ताविक संतोष रजपूत यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले. आभार भिकाजी देवकर यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *