कौलगेमध्ये बालविवाह प्रकरणी ६ जणावर मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल

मुरगूड ( शशी दरेकर ) : कौलगे, ता. कागल येथे संभाजी आनंदा पाटील यांच्या मुलाशी अल्पवयीन मुलीचा होणारा बाल विवाह रोखून ६ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ चे कलम ९ , १० , ११ प्रमाणे मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मुरगूड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, भुदरगड तालुक्यातील पाल पैकी देसाईवाडीतील अल्पवयीन मुलगी दिव्या रंगराव … Read more

मुरगूडच्या शिवप्रेमीतर्फे ” शिवप्रताप दिन ” उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल मुरगूड नगरपरिषदच्या प्रांगणात छ . शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालून ” शिवप्रताप दिन ” मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजेखान जमादार म्हणाले प्रत्येक मावळ्यांचे रक्त सळसळून निघेल अशी ऐतिहासिक घटना १० नोव्हेंबर १६५९ रोजी घडली . … Read more

दलितमित्र एस .आर. बाईत यांचे सामाजिक कार्य चळवळीतील कार्यकर्त्यांना दिशादर्शक

सोनगे येथील प्रबोधन मेळाव्यात कॉ. संपत देसाई यांचे प्रतिपादन मुरगूड ( शशी दरेकर) : दलितमित्र एस. आर. बाईत यांचे पन्नास वर्षातील सामाजिक कार्य नव्या दमाच्या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उर्जा देणारे व मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन परिवर्तनवादी चळवळीतील जेष्ठ नेते कॉ. संपत देसाई (आजरा) यांनी केले. ते सोनगे ता.कागल येथे गहिनीनाथ सहकार समूह व … Read more

जिल्हा बँकेच्या ठेवीवरील व्याजात वाढ

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेवीवरील व्याजदरात भरघोस वाढ करण्याचा निर्णय अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे ठेवीवरील कमाल व्याजदर साधारणतः ७.९० टक्के होतो. लवकरच बँकेने नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवीचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प केला आहे. बँकेने राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त यशवंत पुनर्गुंतवणूक आणि यशवंत रिकरिंग … Read more

राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्नामुळे कुरणीच्या पाटील कुटूंबियानां दिड लाखाचे आर्थिक सहाय्य मंजूर

मुरगूड ( शशी दरेकर ) : राजे फाउंडेशनच्या सहकार्याने मेंदूची शस्त्रक्रिया झालेल्या कुरणी येथील संदीप मारूती पाटील याना पन्नास हजार रुपये व अनिल दिनकर पाटील यांच्या तेरा दिवसाच्या बालिकेचे योग्य ते उपचार करुनही फुफ्फुसाच्या विकाराने मृत्यू झालेने त्यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपये असे एकूण दीड लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झाले आहेत. हा निधी … Read more

मुरगूडमधल्या कविसंमेलनात कवितांच्या वर्षावात-रसिक ओलेचिंब

मुरगूड ( शशी दरेकर ) : शहरातील ज्येष्ठ नागरीक संघ व प्रदिप वर्णे वाढदिवस सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केंद्रात कविसमेलन झाले. कवी एम डी रावण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसमेलनास रसिकांनी उस्पूर्त प्रतिसाद दिला. व कवितांच्या वर्षावात रसिक ओलेचिंब झाले . यावेळी बोलताना कवी भैरवनाथ डवरी म्हणाले ‘ सोशल मिडियाच्या युगात … Read more

नांदणी स्पोर्ट्स ठरला फौजदार चषक 2022 चा मानकरी

कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे फौजदार चषक – 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नांदणी स्पोर्ट्स ने अंतिम सामना जिंकत प्रथम क्रमांक पटकाविला व फौजदार चषकचा मानकरी ठरला. यावेळी अंतिम सामना करनूर स्पोर्ट्स, करनूर व नांदणी स्पोर्ट्स, नांदणी यांच्यात झाला. यामध्ये नांदणी स्पोर्ट्स ने प्रथम क्रमांक पटकाविला. व करनूर स्पोर्ट्सचा … Read more

उत्कंठावर्धक ‘वेड’ लावणारा टिझर…

टिझरने ’वेड’ बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षयकुमारला देखील लावले.अभिनेता रितेश देशमुख यांनी आपले मित्र अक्षय कुमार यांना वेड चा टिझर पाहण्यासाठी पाठवला आणि तो त्यांना इतका आवडला कि त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून लगेचच शेअर केला. 20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार्‍या ’वेड’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टिझर
नुकताच सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार
या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली
आहेत. तर गीते अजय -अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. वेड चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत.

सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे. संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत. जिनिलिया देशमुख यांनी वेड चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज या चित्रपटाचा टिझर मुंबई फिल्म कंपनी ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता या टिझर द्वारे निर्माण झाली आहे.

संविधानिक मूल्यांच्या परिघातूनच आधुनिक भारताची उभारणी

कोल्हापूर : संविधानिक मूल्यांच्या परीघ विस्तारातूनच खऱ्या अर्थाने आधुनिक भारताची भक्कम उभारणी शक्य आहे. असा सूर शनिवारी शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘जगण्यातलं संविधान’ या विशेष परिसंवादात उमटला. संविधान दिनानिमित्त राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीने ‘जगण्यातलं संविधान ‘हा राज्यस्तरीय परिसंवाद विद्यापीठाच्या राजर्षी शाहूसभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे … Read more

सामाजिक सुधारणेचे अग्रदुत – ‘महात्मा’ जोतिबा फूले

हजारो वर्षापासुन मुक्या जनावाराप्रमाणे राबणार्‍या व जाती व्यवस्थेचे जोखड खांद्यावर वाहणार्‍या लाखो लोकांना जीवनमुक्तीने देणारा मुक्तीदाता म्हणजे महात्मा जोतिबा फुले होय. माहात्मा फुले राष्ट्रपुरुष तर आहेतच पण ते आधुनिक युगातील महामानव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान राष्ट्रपुरुष महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानीत. बाबासाहेबांचे तीन गुरु. भगवान गौतम बुध्द, संत कबीर आणि फुले या तीन … Read more

error: Content is protected !!