एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन – आमदार हसन मुश्रीफ

आमदार हसन मुश्रीफ यांचे किरीट सोमय्या यांना प्रतीआव्हान कागल : भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर आता हसन मुश्रीफ यांनी पलटवार करत आरोप खोडून काढले आहेत. सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, अशी प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी … Read more

हुपरी येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीची यात्रा १३ फेब्रुवारी

हुपरी : हुपरी येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीची यात्रा दि. १३ त १५ फेब्रुवारी यात आहे. त्यानिमित्त अनेक धार्मिक, सांस्कृतिक, विविध स्पर्धा व निकली कुस्त्यांचे जंगी मैदान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे. यात्रेत दि. १३ रोजी पहिली पालखी पहाटे ४ वाजता, दुसरी पालखी दुपारी … Read more

 दोन महिन्यात 305 कार्यालयांची बिंदूनामावली तपासणी पूर्ण – सहायक आयुक्त मंजिरी मनोलकर

पुणे, दि.8 : पुणे विभागांतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बिंदूनामावली तपासणीचे कार्य जोरदारपणे सुरु असून विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनात मागासवर्ग कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी डिसेंबर 2022 व जानेवारी 2023 या दोन महिन्यांत विभागातील 305 कार्यालयांच्या बिंदूनामावली प्रमाणित करुन दिली असल्याची माहिती मागासवर्ग कक्षाच्या सहायक आयुक्त मंजिरी मनोलकर यांनी दिली आहे. सामान्य प्रशासन … Read more

शाहू मार्केट यार्ड परिसरात कलम 144 लागू

कोल्हापूर, दि. 8 : माथाडी कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी, प्रतिनिधी, हमाल व सभासद यांच्या जिवीताला व सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्याची अथवा सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा संभव असल्याने प्रतिबंध व्हावा, यासाठी करवीरच्या कार्यकारी दंडाधिकारी शितल मुळे-भामरे यांनी फौजदार प्रक्रिया संहिता 1973 मधील कलम 144 अन्वये गुळ मार्केट मधील विष्णु शंकर रेडेकर, सुभाष बळवंत यादव, प्रकाश गुंगा खाडे, … Read more

अग्निवीरच्या भरतीसाठी 11 मार्च पर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

kargil5

कोल्हापूर, दि. 8 : अग्निपथ योजनेंतर्गत कोल्हापूर येथे 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 या कालावधीत वर्ष 2023-24 साठी अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर प्रवेशासाठी ऑनलाईन सीईईसह नवीन भरती प्रणाली राबविण्यात येणार आहे. या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी पात्र अविवाहितांनी दि. 10 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 या कालावधीत (CEE) अर्जाची ऑनलाईन नोंदणी/सबमिशन करण्याचे आवाहन कर्नल आकाश मिश्रा … Read more

गोरंबेतील दोन संस्थेत चोऱ्या

सुमारे ६० हजार रुपयांची रोकड लंपास सिद्धनेर्ली : गोरबे (ता. कागल) येथील जय भवानी विकास सेवा संस्था व श्री गुरुकृपा सहकारी दूध संस्था या दोन्ही संस्थांमध्ये सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. गावातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या श्री गुरुकृपा दूध संस्था व जय भवानी विकास सेवा संस्थेच्या दोन्ही इमारती जवळजवळ … Read more

हुपरी परिसरातील अंमली पदार्थ (गांजा) विक्रीस तात्काळ आळा घाला, अन्यथा शिवसैनिक याचा बंदोबस्त करतील – जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव

हुपरी : हुपरी व परिसरातील अंमली पदार्थ (गांजा) सेवन व राजरोसपणे सुरू असलेल्या विक्रीस तात्काळ आळा घालावा व या जाळ्यात सामील असणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींना कठोर शासन करावे. अन्यथा शिवसैनिक कायदा हातात घेवून अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करेल, अशा आशयाचे निवेदन शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव व पदाधिकारी यांनी स.पो.नि. पंकज गिरी हुपरी पोलीस ठाणे यांना दिले. … Read more

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला शिवाजी विद्यापीठाच्या विधी विद्यार्थ्यांनी दिली भेट

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विधी विभागाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणास भेट देऊन ‘मध्यस्थी’ विषयावर पथनाट्य सादरीकरण केले.  कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव प्रीतम पाटील, विद्यापीठाचे विधी विभाग प्रमुख डॉ. विवेक धूपदाळे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे उपाध्यक्ष विवेकानंद घाटगे, कौटुंबिक न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र पाटील  उपस्थित होते. डॉ. धूपदाळे यांच्या हस्ते जिल्हा … Read more

मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा

मुंबई : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० नुसार कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने साजरा करण्यात येतो. मराठी भाषेला संत ज्ञानेश्वर, महानुभवापासून ते अगदी अलिकडच्या सोशल मीडिया युगापर्यंत मराठी परंपरेचा एक दीर्घ असा वारसा आहे. देशी आणि परदेशी भाषांचे आक्रमण होऊनही मराठी भाषा … Read more

गांधीजी मारूनही मरत नाहीत हे प्रतिगाम्यांचे दुखणे

gandhiji

30 जानेवारी 2023 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खुनाला 75 वर्षे पूर्ण होतात. इतकी वर्ष होऊनही गांधीजींच्या खुनाला जबाबदार असणारी गोडसेवादी हिंसक प्रवृत्ती आपण गांधींना मारून चूक केली हे कबूल करीत नाहीत. उलट महात्मा गांधीजींची टवाळी करणे, गांधीजींना दोष देणे, प्रसारमाध्यमातून गांधीजींची बदनामी करणे कमी झालेले नाही. गांधीजींच्या खुनाचे समर्थन करून आपण किती निर्लज्ज आहोत … Read more

error: Content is protected !!