बातमी

सरवडेच्या जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्साहात

मुरगूड ( शशी दरेकर ) : सरवडे ता. राधानगरी येथिल जिज्ञासा प्री -प्रायमरी स्कूलमध्ये बालचमुंनीं आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा केला.श्री. विठ्ठल -रूक्मिणी, वारकरी , तर कोणी संतांच्या वेषभूषा परिधान केल्या होत्या.

यावेळी टाळ – मृदुंग, भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन बघून जणू पंढरपूरच्या वारीत असल्याचे जाणवत होते .
यावेळी कार्यक्रमात सरवडेगावच्या प्रथम नागरिक सौ. निर्मलादेवी राजेंद्र पाटील (सरपंच), संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुवर्णाताई बळीराम रेपे, तसेच इतर संचालिका व अध्यापक वर्ग, लहान मुले, महिला वर्ग, पालक मोठया संख्येने उपस्थित होता.

कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन शाळेच्या मुख्याधिपीका सौ .दिपाली बाबासाहेब रेपे यांनी केले. शेवटी उपवासाच्या फराळांचे वाटप सौ. शोभा भिमराव रेपे, सौ. अरूणा अर्जुन रेपे यानीं केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *