बातमी

बकरी ईद दिवशीच 30 हजार रुपये किंमतीचा बोकड डि पी ला शाॅक लागून जागीच मरण

मुरगूड (शशी दरेकर) : कापशी ता कागल येथे माय्याप्पा डोणे यांचा कळप कापशी लिंगनुर रस्त्याने जात असताना रस्त्याच्या साईटला विद्युत डी पी होता. रस्त्याने जात असताना कळपातील एक बकरे त्या डीपी खाली चरण्यासाठी गेले. डीपीला करंट उतरल्यामुळे तो करंट बकऱ्याला लागून बकरे मरण पावले.

ही घटना यशवंत क्रांती संघटना कागल तालुका उपाध्यक्ष मा श्री सिध्दू दिवटे व सामाजिक कार्यकर्ते मा श्री संदिप हजारे कागल यांना ही घटना समजताच तातकाळ विद्यूत आधिकार्याशीं बोलून त्यांना तात्काळ मदत मिळवून दिली.

त्या ठिकाणी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते मा श्री संदिप हजारे, कागल यशवंत क्रांती संघटना कागल तालुका उपाध्यक्ष सिध्दू दिवटे, सोमा डोळे, मायाप्पा पिसुत्रे, क-याप्पा अनुशे, केचाप्पा डोणे, विठ्ठल अनुशे, बंडा दुधाचे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *