बातमी

मुरगूड मधील बोगस डॉक्टर कदम यांना अटक

30 जून पर्यंत पोलीस कोठडी

मुरगूड (शशी दरेकर) : रुग्ण महिलांशी लगट करून गैरवर्तन करत त्यांच्या चित्रफिती बनवणाऱ्या बोगस डॉक्टरला बुधवारी कागल पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिलीय. दत्तात्रय शामराव कदम (मुरगूड, ता. कागल) असं त्याचं नाव आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून दत्तात्रय कदम याचा मुरगूड येथे आयुर्वेदिक दवाखाना आहे. त्याच्याकडे राज्य परराज्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत होते. दवाखान्यात येणाऱ्या महिला रुग्णांशी जवळीक करून त्याने अनेकांशी लैंगिक संबंध प्रस्थापित करत त्याच्या चित्रफिती तयार केल्या होत्या.

याबाबतचे अश्लील फोटो आणि चित्रफिती परिसरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर या बोगस डॉक्टरला अटक करावी यासाठी नागरिकांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढला होता.

मुरगूडचे सपोनि विकास बडवे यांनी स्वतः तक्रार देवून कदम याच्यावर गुन्हा नोंद केला होता. कदम याला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. याबाबतची माहिती कागलचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *