बातमी

येशीला पार्क येथे घरफोडी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी केले लंपास

कागल : कागल येथील शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर राहणारे तलाठी दिंगबर विष्णू कांबळे यांच्या घरी ३ लाखाचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

दि. २५/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वा. ते दि.२८/०६/२०२३ रोजी पहाटे ०१.१५ वा. चे दरम्यान प्लॉट नं. ३२ शाहु कारखाना ऑफिस मागे, एशिला पार्क समोर दिंगबर विष्णू कांबळे यांच्या राहत्या घरी मागील बाजूने किचन कट्यावरील खिडकीचे गज कट करुन वाकवून त्यातून आत प्रवेश करुन बेडरुम मधील असलेले कपाटातील ड्राव्हरमधील सोन्याचे दागिने (सोन्याचा राणी हार, सोन्याचे मंगळसुत्र, सोन्याच्या अंगठया तीन, सोन्याची कानातील बाली दोन नग, सोन्याचे कानातील टॉप्स दोन जोड (चार नग), सोन्याची रिंग एक जोड ) व रोख रक्कम असे एकुण ३,१७,०००/- ची चोरी केली आहे.

सदर चोरीची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर गुन्हाचा तपास पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *