बातमी

हळदी येथे ट्रॅक्टरच्या धडकेत युवकाचा मृत्यू

मुरगुड ( शशी दरेकर ) : हळदी (ता. कागल ) येथील रोहित वाकोजी सावरतकर वय वर्षे १८ याचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू झाल्याचे मुरगूड पोलिस स्टेशन मध्ये नोंदवलेल्या फिर्यादीवरून सांगण्यात आले.

पोलिसांतून मिळालेल्या अधिक माहिती वरून हळदी ते कापसी रोडवरील हळदी नावाच्या शेतामध्ये जेसीबी व ट्रॅक्‍टरच्या साह्याने माती काढण्याचे काम सुरू असता ट्रॅक्टर चालक दिगंबर विलास कानडे रा. दौलतवाडी (वय 31वर्षे ) याने ट्रॅक्टर नं. एम एच १७ ए ए o६७१ हा हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणे चालवून मयत रोहित वाकोजी सावरकर यास समोरून धडक देवून त्याचे मृत्यूस कारणीभूत झालेची फिर्याद मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक
राहुल अंतेश्वर वाघमारे यांनी दिली.

याबाबत सरकार तर्फे टॅक्टर चालक दिगंबर विलास कानडे याचे विरुद्ध भादविस कलम ३०४ (अ) २७९ प्रमाणे फिर्यादीने फिर्याद दिलेने गुन्हा दाखल केला आहे . सदर घटना २८ / ४ / २०२२२ रोजी १.३० वा घडल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *