मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ( ता. कागल ) येथिल ग्रामदैवत श्री अंबाबाई मंदीराचे काम पूर्ण झाले असून या मंदीराचा वास्तूशांती सोहळा मुरगूडच्या लौकिकास शोभेल असा लोकोत्सव पध्दतीने साजरा व्हावा अशी अपेक्षा खासदार संजय मंडलिक यांनी नियोजन बैठकीत बोलताना व्यक्त केली .
या वास्तुशांती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात नियोजनार्थ बैठक झाली . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील होते . तर गोकूळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील , रविराज पाटील , अविनाश पाटील , माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार , नामदेवराव मेंडके आदि प्रमुख उपस्थित होते .बैठकीत खासदार मंडलिक म्हणाले , अंबाबाई मंदीराच्या उभारणीत सर्वांनी मदत केली आहे .वास्तु शांती सोहळ्यात प्रत्येक नागरिकांचा खारीचा वाटा असला पाहिजे .
यावेळी प्रविणसिंह पाटील व गोकूळचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील यांनी ही सोहळ्या संदर्भात सुचना मांडल्या
येथील जागृत ग्रामदैवत अंबाबाई मंदीर नव्याने बांधण्यात आले आहे . या मंदीराची उभारणी हेमाडपंथी पध्दतीने करण्यात आली आहे . आता या मंदीराची मुहुर्तमेढ , होमहवन , वास्तुपुरुष , वास्तुशांती , कलशारोहण , आशीर्वचन व धार्मिक विधी सोहळा दि २४ ते २७ जानेवारी अखेर चार दिवस होणार आहे .यासाठी परमाब्धीकार राजीवजी महाराज यांना निमंत्रित करण्यात आले आहे . तसेच दि – २८ रोजी सुमारे पाच हजार माहेरवाशिनींना निमंत्रित करण्यात येणार असून या दिवशी सुमारे पंधरा हजार लोकां साठी महाप्रसाद होणार आहे .
बैठकीत माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके यांनी स्वागत केले . यावेळी झालेल्या चर्चेत ,जोतीराम सुर्यवंशी;एस.व्ही.चौगले, किरण गवाणकर , एम डी. रावण , संतोष वंडकर, गजानन साळोखे,संदिप भारमल, दिगंबर परीट , सुहास खराडे , दत्तात्रय साळोखे, नामदेव भांदिगरे, राहुल वंडकर, दत्तात्रय मंडलिक राजू आमते, दिपक शिंदे. आदिंनी सहभाग घेतला . बैठकीस आजी- माजी नगरसेवक ,गावचे रयत ,अंबाबाईचे पुजारी गुरव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . जयसिंग भोसले यांनी आभार मानले .
फोटो – मेल
…..