बातमी

निढोरीतील संजय कांबळे कुटुंबियांचा हा अनोखा उपक्रम

अनेक विधवांचे मनोबल वाढवणारा – विकास सावंत

मुरगूड ( शशी दरेकर ) : एखाद्या स्त्रीचा पती अचानक सोडुन जाणं हे दुर्दैवीच असतं पण पतीच्या पश्चात तिला दिली जाणारी तुसडेपणाने व हिन दर्जाची वागणुक हि त्याहूनही दुर्देवी आहे.

समाजातील विधवा स्त्रीयांची होणारी प्रतारणा विचारात घेवून विधवांना इतर सधंवाप्रमाणेच वागणुक देण्याचा संकल्प करण्याची गरज आहे असं मत शाश्वत विकास चळवळीचे व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे युवा विभाग प्रमुख विकास सावंत यांनी स्लॅब शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले.

निढोरी ता.कागल येथील संजय लक्ष्मण कांबळे यांच्या राहत्या घराचे बांधकाम चालू असून त्यांनी ग्रामीण भागातील प्रथेनुसार स्लॅब कामाचा शुभारंभ आयोजित केला होता.

या कामाचा शुभारंभ त्यांनी आपल्या 20 वर्षापासुन विधवा असणार्‍या आईच्या हस्ते म्हणजेच आक्कुबाई लक्ष्मण कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केला व उपस्थित विधवांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित केला होता. या ७ कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकनाथ कांबळे होते. स्वागत सुरज कांबळे यांनी उपस्थितांना गांधी टोपी घालून केले.

विकास सावंत पुढे म्हणाले,पती गेल्यानंतर विधवेला जगावं लागणारं अन्यायग्रस्थ जीवन म्हणजेच निरपराधला विनाकारण दिली जाणारी शिक्षाच होय अशा रुढी परंपरागत व्यवस्थेला छेद देत कांबळे कुटुंबियांनी आपल्या विधवा आईच्या हस्ते केलेला हा सॅल्ब शुभारंभ हा अनेक विधवा स्त्रीयांच मनोबल वाढवणारा तर आहेच पण समाजालाही दिशा देणारा आहे.

यावेळी बोलताना संजय कांबळे म्हणाले, माझ्या या शुभ कामामध्ये माझ्या आईचे खुप मोठे योगदान असुन माझ्या आईवडिलांच्या आशिर्वादावरच अनेक वर्षे प्रलंबित असलेला घर बांधकामाचा प्रश्न मार्गी लावत आहे.

जरी माझ्या वडीलांनी लक्ष्मण कांबळेंनी अवेळी निरोप घेऊन आम्हाला पोरके केले असले तरी माझ्या आईच्या रुपात मला माझे आबा (वडील) दिसतात. त्यामुळे माझी आई इतरांच्या दृष्टीने जरी विधवा असली तरी मी तिला सधंवाप्रमाणे वागणूक देण्याचा निश्चय केला आहे.

वडिलांच्या पश्चात विधवा म्हणून तिने अन्यायग्रस्थ जीवन जगणं मला कधीच मान्य नाही म्हणूनच हा आजचा स्लॅब शुभारंभ माझ्या आईच्या शुभहस्ते करीत आहे.

या कार्यक्रमासाठी शाश्वत विकास चळवळीचे व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे युवा विभाग प्रमुख विकास सावंत,वंचित बहुजन आघाडीचे सुनिल कांबळे,माजी सरपंच शारदा कांबळे,इंजिनियर अमर कळमकर,संगीता कांबळे,वर्षा माने,सुनिता डवरी,मनोज माने,ओंकार कांबळे,सिदुबाबा डवरी,सुरज कांबळे, धीरज कांबळे, कृष्णात कळमकर,बंटा गुरव,युवराज कांबळे निवृत्ती सुतार आदी.मान्यवर उपस्थित होते.आभार धिरज कांबळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *