मुरगूड ( शशी दरेकर) – नवीद मुश्रीफ (संचालक गोकुळ दूधसंघ), युथ सर्कल मंडळामार्फत ह. भ.प मधुरा दीदी बाजीराव जाधव बेनिक्रे यांचा कार्यक्रम व ज्येष्ठांना बसण्यासाठी (बाकडी) बैठक व्यवस्था केली आहे व सभासदाच्या चांगले काम करणाऱ्या, शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मुलांचा सत्कार करून युथ सर्कल या मंडळाने खरा गणपती उत्सव साजरा केला. समाजाला आदर्श घालून दिला आहे . आज कालची पिढी डॉल्बी, मोबाईलमुळे नको तिकडे भटकत आहे. पण अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभासदांचे मी मनापासून अभिनंदन करतो असे मत गोकुळ दूध संघाचे संचालक नावीद मुश्रीफ यांनी केले.
बक्षीस वितरण समारंभाचे अध्यक्ष – स्थानी धोंडिराम चव्हाण तर प्रमुख उपस्थिती दिग्विजय पाटील ,सत्यजित पाटील ,बळीराम डेळेकर ,बाळासो पुजारी, सदाशिव सारंग ,तुकाराम पुजारी ,दत्तात्रय चव्हाण उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब डेळेकर, सुरेश शिंदे, विलास डेळेकर, संदिप चव्हाण, विठ्ठल मेटकर, पांडुरंग पुजारी ,विशाल नलवडे,आकाश डेळेकर, अनिकेत नलवडे, सचिन सारंग, सचिन चव्हाण, प्रकाश मेंटकर. आदी उपस्थित होते . स्वागत नगरसेवक राहुल वंडकर प्रास्ताविक राजू चव्हाण तर आभार ओंकार वंडकर आणि सुत्रसंचलन संदिप सारंग, आपाजी मेंटकर यांनी केले