मडिलगे (जोतीराम पोवार): वाघापूर ता.भुदरगड येथील महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिर्लिंग देवालयास प्रत्येक रविवार, अमावस्या व प्रत्येक वर्षी भरणाऱ्या नागपंचमी यात्रे करिता असंख्य भाविक भेट देत असतात या भाविका करता एसटी महामंडळाच्या गारगोटी, कागल, राधानगर, कोल्हापूर आदी आगारातून ज्यादा बसेस सोडल्या जातात या एकाच दिवशी एसटी महामंडळास तब्बल दहा ते पंधरा लाखांचे उत्पादन मिळते.
मात्र एकाच दिवशी लाखोंचे उत्पादन देणाऱ्या या गावातील नागरिक तसेच भाविकांना गेली नऊ महिने एस .टी.ची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे विदारक चित्र सध्या पहावयास मिळत आहे . याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिक, भाविक प्रवासांच्या सुविधेसाठी एसटी सुरू करण्याकरता वेळोवेळी कागदोपत्री पाठपुरावा करून देखीलही गारगोटी आगार व्यवस्थापनाने याची गंभीर दखल घेतलेली नाही .नुकताच दहावीचा निकाल लागला असून महाविद्यालयीन शिक्षणाकरता येथील विद्यार्थी मुदाळतिट्टा, गारगोटी, बिद्री, निपाणी, तसेच मुरगुड येथे मोठ्या संख्येने जात असतात याशिवाय दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक प्रवासी यांचे अधिक प्रमाण आहे विशेष बाब म्हणजे गेली दोन वर्षे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील नागपंचमी यात्रा रद्द करण्यात आली होती.
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येत्या काही दिवसानंतर ही यात्रा होत आहे यावेळी भाविकांची संख्या दुप्पट होणार असल्याचे वर्तवले जात आहे . याकरिता एसटी महामंडळाने या गावासाठी रोजच्या नियमित गारगोटी.. निपाणी व कोल्हापूर बस फेऱ्या तसेच भाविकांचीगैरसोय होऊ नये याकरिता यात्रा काळात ज्यादा बसची उपलब्ध व्हावी याकरिता गारगोटी आगाराने नियोजन करावे . अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ तसेच भाविक प्रवासांच्यातून होताना दिसत आहे.
अपुऱ्या बसेस…. गारगोटी आगार विभागातून खेडोपाडी बसेस धावायच्या झाल्यास किमान 70 बसेसची आवश्यकता आहे मात्र सध्या आगारात केवळ 55 बस उपलब्ध आहेत यात दोन बस ह्या पूर्णतः निकामी असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले . यावेळी वाढीव बस उपलब्ध झाल्यास टप्प्याटप्प्याने खेडोपाडी बस सेवा सुरळीत सुरू करणार असल्याचे आगार प्रमुख ठोंबरे यांनी साप्ताहिक गहिनीनाथ समाचारशी बोलताना व्यक्त केले