बातमी

हमिदवाडा कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी – राजे समरजीतसिंह घाटगे यांचे प्रसिद्धी पत्रक

गट- तट न मानता बिनविरोधासाठी सर्वांनी सहकार्य करणेचे आवाहन

कागल(विक्रांत कोरे) : लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका स.सा.कारखाना हमिदवाडा-कौलगे या साखर कारखान्याची 2023-28 या वर्षांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.कारखान्याची ही पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जाहीर पाठिंबा देत असलेचे पत्रक भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

स्व. खास. सदाशिवराव मंडलिक साहेब संस्थापक असलेला हा साखर कारखाना त्यांच्या आशीर्वादाने व खा.संजयदादा मंडलिक यांच्या नेतत्वाखाली चांगला व सुरळीतपणे सुरू आहे.त्यामुळे या कारखान्याची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी त्यासाठी आमचे सर्वोतोपरी सहकार्य राहील.

“विना सहकार,नाही उद्धार” हे ब्रीद उराशी बाळगून स्व.राजे विक्रमसिंह घाटगे आणि स्व.खास. सदाशिवराव मंडलिक साहेब यांनी जिल्ह्याच्या समाजकारणात आणि राजकारणात अत्यंत प्रामाणिक आणि नम्रपणे सहकार खोलवर रुजविला आहे .ही बाब तर सर्वश्रुतच आहे. तसेच कोणतीही सहकारी संस्था जर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावयाची असेल तर त्या संस्थेवर होणारा अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. विशेषतः निवडणुकीवर होणारा वारेमाप खर्च हा कोणत्याही सहकारी संस्थेस आर्थिक दृष्ट्या परवडणारा नसतो, त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध करण्याकडे त्यांचा कल होता.

त्या अनुशंगाने बहुजनांच्या या श्रम मंदिराची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करणेसाठी इतर सर्वांनीही सहकार्य करावे असे आवाहन ही प्रसिद्धी पत्रकातून श्री घाटगे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *