बातमी

मोटरसायकलला अडकविले पैशाची बॅग लांबवली

कागल (विक्रांत कोरे) : मोटरसायकलला अडकविलेली रुपये पन्नास हजाराची बॅग अज्ञान चोरट्यांनी हातोहात लांबवली. चंद्रकांत दिवटे राहणार अखिलेश पार्क, कागल यांनी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ही घटना दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्राच्या दारात घडली. श्री दिवटे यांनी बँकेतून काढलेली रुपये पन्नास हजाराची बँक आपल्या मोटरसायकलच्या हॅंडेलला अडकवली होती.

दरम्यान अज्ञात चोरट्याने बॅग घेऊन पलान केले, चोरट्यांचा शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. पुढील तपास हवालदार व्हि टी पाटील हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *