मडिलगे (जोतीराम पोवार) : वाघापूर तालुका भुदरगड येथील ज्योतिर्लिंग वाचनालयाचे ग्रंथपाल धोंडीराम राजाराम गुरव यांची कन्या निकिता गुरव हिची मुंबई पोलीस म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. जिद्द ध्येय व चिकाटीच्या बळावर तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तसेच एका ग्रंथपालाची मुलगी मुंबई पोलीस झाली याबद्दल परिसरातून तिचे कौतुक होताना दिसत आहे.
तिला किरण गुरव व जेके स्पोर्ट्स करियर अकॅडमीचे संस्थापक संदीप कोळी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले वडील ग्रंथपाल, ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाचे निशीम पुजारी आई संगीता गुरव यांनी तिला लहानपणापासूनच वाचनाची गोडी तसेच शालेय स्तरातून विविध स्पर्धांमधून भाग घेण्यास प्रोत्साहित केले होते.
धोंडीराम गुरव हे वाचनालयाच्या माध्यमातून अभ्यासू विद्यार्थ्यांना सैन्य दलातील भरती असो किंवा पोलीस भरती तसेच स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना नेहमी विनामूल्य पुस्तके वाचनालयातून देतात त्याचबरोबर समाजकार्यातही त्यांचा नेहमी सहभाग असतो निकिताच्या या यशाबद्दल गुरव समाज, स्थानिक ग्रामस्थ तसेच सरपंच बापूसो आरडे, उपसरपंच संगीता शिंदे, गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील, के डी सी बँकेचे संचालक अर्जुन आबिटकर यांनी नुकताच निकिताचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या