मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल महादेव गल्लीत राहणारे सुरेंद्रकुमार यादव यांचा ४१वा वाढदिवस मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. मुळ गांव भगवानपूर जि.गोरखपूर येथील वडिलांचे छ्त्र हरपलेल्या सुरेंद्रकुमार हे मुरगूड येथे १० वर्षे बिल्डींग कलर, पुट्टी अशा व्यवसायात मुरगूड परिसरात नावलौकीक मिळवत मोठा मित्रपरिवार गोतावळा गोळा करून गावाकडच्या कुंटूबाचा उदरनिर्वाह करीत आहेत .
त्यांच्या या व्यवसायात भरभरारी होवो अशी सदिच्छा व्यक्त करून त्यानां दिर्घायुष्य लाभो अशी मित्रपरिवानीं ईश्वरचणी प्रार्थना केली. या वाढदिवासावेळी सुधीर सावर्डेकर वकील , माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, पांडूरंग कुडवे, शशी दरेकर, दिपक शिंदे, आकाश दरेकर इंजिनिअर, शिवाजीराव पाटील, भैया शिंदे, राजू भाट, सिध्देश पोतदार, बाबूराव रेंदाळे, मुरगूडमधील सर्व इंजनिअर स्टाफ, यांच्यासह मित्रपरिवार मोठया संख्येने उपस्थित होता.