कागल / प्रतिनिधी : कागल येथील न्यायालयात लोक अदालत नुकतेच पार पडले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार ,कागल येथील दिवाणी कनिष्ठ न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रिलिटीगेशनची बँकेच्या 1182 प्रकरणांपैकी,54 प्रकरणे तडजोडीने निकालात काढण्यात आली. यामध्ये रुपये 31 लाख 57 हजार0 59 इतक्या रकमेची वसुली करण्यात आली. फ्री लिटीगेशनची ग्रामपंचायत 270 प्रकरणांपैकी 102 प्रकरणे तड जोडीने मिटविण्यात आली. यामध्ये 5लाख 13 हजार 115 रुपये वसूल करण्यात आले. प्रलंबित दिवाणी 9 प्रकरणे व फौजदारी 165 प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 25 लाख 91 हजार 310 रुपये वसूल करण्यात आले.
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्री बी डी गोरे यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले एडवोकेट एस आर दावणे यांनी पॅनल सदस्य तसेच सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ श्री एस बी जवळे, वकील, न्यायालयीन कर्मचारी व पक्षकार बहुसंख्येने उपस्थित होते.