….. आणि भल्या मोठया नागाला जंगलात सोडून दिले जीवदान

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथे शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महाजन कॉलनीतील गवाणकर यांच्या गाडी लावण्याच्या शेडमध्ये गाडी काढण्यास गेलेल्या सनी गवाणकर यांच्या दृष्टीस एक भला मोठा नाग पडला.

Advertisements

याची सविस्तर माहिती अशी सनी गवाणकर आपली फोर व्हिलर गाडी शेडमधून बाहेर् काढण्यास गेले होते . शेडच्या शटरचे दार वर करताच साडेपाच फूटाचा भला मोठा नाग फना काढून समोर उभा राहिला . त्यामुळे सनी गवाणकरची पाचावर धारण बसली . क्षणभर भितीने तो भांबावून गेला. भितीने तो तसाच मागे वळला .व सर्पमित्र राहूल भोळे, सुशांत कलकुटकी, किरण सुर्यवंशी यानां फोन करून बोलावून घेतले.

Advertisements

सर्पमित्र राहुल भोळे यानीं या भल्या मोठ्या नागाला पकडण्यात यश मिळवले. कसलीही इजा न करता नागाला पकडल्या नंतर कोणताही सर्प असला तरी त्याला मारु नका तो आपला मित्र आहे. असे उपस्थितानां प्रबोधन करत त्याला जंगलात सोडुन देऊन जीवदान दिले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!