बातमी

मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारा अभावी रुग्णांचे हाल

रुग्णांची वाढती गर्दी सुविधा अपुऱ्या याला जबाबदार कोण ?

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुरगूड ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेता व अनेक गावचे डेंग्यूसदृश्य रुग्ण दाखल होत असताना त्यांना बेड मिळत नाहीत एका कंत्राटी डॉक्टर व नर्सवर रुग्णालय चालत असल्याचा अनुभव आज आला . आरोग्य प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे . रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे यास जबाबदार कोण ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुरगूड बरोबरच परिसरातील ३५ गावच्या रुग्णांचे आरोग्य सांभाळणारे मुरगूडचे ग्रामीण रुग्णालय अनेकवेळा सलाईनवर चालविण्याची वेळ येत आहे . येथे कायमस्वरुपी व तज्ञ डॉक्टर नाही . सेवक वर्ग पूरेसा नाही . दररोज दोनशेहून अधिक बाहयरूग्ण औषधोपचारासाठी येतात . त्यांच्यावर उपचार करणारे एकमेव कंत्राटी डॉक्टर असतात . ते बाहय रुग्णाबरोबर तीस बेडवरील अंर्त रुग्णांना काय न्याय मिळणार ?एवढया मोठया रुग्णालयाला अद्याप कायमस्वरुपी तज्ञ डॉक्टर मिळत नाही . ही गंभीर बाब आहे .

या रुग्णालयात वेगवेगळ्या स्वरुपातील तीनशे रुग्णांसाठी एक नर्स सेवेत असते . या नर्सला बाहय रुग्णांना इंजेक्शन देणे त्यांचा रक्तदाब तपासणे ‘ जखमी रुग्णांचे ड्रेसिंग करणे त्याशिवाय ऑपरेशन थिएटर सांभाळणे’ पुरूष जनरल वॉर्ड ‘ स्त्री जनरल वॉर्ड मध्ये रुग्णांकडे लक्ष ठेवणे त्यांना वेळेवर औषधोपचार देणे ‘ आदि कामे करताना या एका नर्सला सेवा देताना मोठी कसरत करावी लागते . यावरुन या तीस बेडच्या ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवा कशी चालते याची प्रचिती येते . त्याबद्दल सर्वसामान्य रुग्णातून कमालीचा संताप व्यक्त होत आहे . सध्या डेंग्यूची साथ फैलावत आहे शकडो डेंग्यूचे रुग्ण येथे येतात त्यांच्या तपासण्या व वेळेवर उपचार होणे अशक्यप्राय ठरत आहे . कांही रुग्णांना येथे बेड शिल्लक नाही असे सांगून दुसरा रस्ता दाखवला जातो.

या ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा पूर्णतः कोलमडली आहे . रिक्त पदांची भरती नाही . कंत्राटी सेवकांना खाजगी ठेकेदारांकडून सहा महिने पगार नाही . त्यामूळे ते सेवा सोडून जात आहेत . या एकूणच सेवेकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे . कांही रुग्ण आरोग्य सेवा मिळविण्यासाठी चक्क दुर्गम भापरिस्थितीत वैद्यकिय अधिक्षकांचेही येथील आरोग्यगातील राधानगरी ग्रामीण रुग्णालयाकडे उलटा प्रवास करताना आढळतात ही नामुष्की का ओढवत आहे . शासन व आरोग्य प्रशासन याची कधी दखल घेणार ? वैद्यकिय शिक्षण मंत्र्यांच्या तालुक्यात ही नामुष्कीच म्हणावी लागेल .

पगारदार घरात व कंत्राटी सेवेत ? डॉक्टर व नर्सची जी परवड आहे तशीच अवस्था १०२ नंबरच्या रुग्णवाहिकेवरील चालकाचीही आहे . या चालकास सहा महिन्यापासून पगार मिळत नाही. त्यातच चालकांना कंपाउंडरचीही कामे करावी लागतात पण अशा प्रसंगी कोणता धोका निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण ? या रुग्णालयाकडे ज्या सफाई कामगार महिला आहेत त्यांनाही तीन महिने होवूनही पगार नाही . त्यामूळे स्वच्छतेचाही बोजवारा उडाला आहे. जे कायमस्वरूपी पगारदार सेवक आहेत ते रजा काढून घरात असतात तर कंत्राटी एक डॉक्टर व कंत्राटी एक आरोग्य सेविका सेवेत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *