मुरगूडच्या शिवराज विद्यालय ज्यू. कॉलेजच्या खेळाडूंचे विभागीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत घवघवीत यश

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथिल शिवराज विद्यालय जू. कॉलेजच्या खेळाडूनी विभागीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. आयन मुजावर ३६ किलो वजन गटात गोल्ड मेडल, सोहम जाधव ३८ किलो वजन गट सिल्वर मेडल , मयूर अस्वले ३२ किलो वजन गट सिल्वर मेडल, वरद चौगले ३५ किलो वजन गट सिल्वर मेडल, श्रेया चिखले ३४ किलो वजन गटात गोल्ड मेडल, जानवी भारमल ३० किलो वजन गटामध्ये गोल्ड मेडल, शर्वरी भारमल ३२ किलो वजन गट – गोल्ड मेडल , विभा पाटील ३६ किलो वजन गटामध्ये सिल्वर मेडल या खेळाडूनी कोल्हापूर येथे विभागीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धामध्ये-यश संपादन केले.

Advertisements

वरील खेळाडूना खासदार संजयदादा मंडलिक, विरेंद्र मंडलिक, अध्यक्ष गजानन गंगापूरे, कार्यवाह आण्णासो थोरवत, प्राचार्य पी .डी. माने, उपप्राचार्य रविंद्र शिंदे, उपमुख्याध्यापक एस. एच. पाटील, पर्यवेक्षक एस .बी. भाट यांचे प्रोत्साहन तर खेळाडूनां एकनाथ आरडे सर, प्रशिक्षक ओंकार सुतार, अतिश आरडे ( एन.आय.एस प्रशिक्षक) यांचे मार्गदर्शन मिळाले . वरील यश संपादन केलेलया खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!