बातमी

उबाठाचे शिवसैनिक मनोहर नलगे यांचा पोलिंग बुथवर काम करताना मृत्यू

खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे यांची आदरांजली

आदित्य ठाकरे यांनी दूरध्वनीद्वारे केले सांत्वन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुंबई येथील वरळी विभागात पोलिंग बुथवर कार्यरत असणारे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक मनोहर रामचंद्र  नलगे (वय 62  )यांचा बुथवर काम करत असताना मृत्यू झाला. मनोहर नलगे यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड ता. कागल येथे त्यांच्या मूळ गावी मंगळवार दि – 21 मे रोजी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

           डिलाईल रोड येथील बी.डी.डी. चाळ क्रमांक 20 परिसरात असणाऱ्या मस्कर उद्यानातील पोलिंग बुथवर मनोहर नलगे हे शिवसैनिक कार्यरत होते. उष्माघाताच्या त्रासामुळे त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले .असता डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.
 

          वरळी येथील भारत मिल हाउसिंग सोसायटी येथे त्यांच्या निवासस्थानी मृतदेह ठेवण्यात आला.खासदार अरविंद सावंत,आमदार सुनील शिंदे यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली.वरळी येथील डिलाईल रोड शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शाखेचे गटप्रमुख म्हणून ते कार्यरत होते.

            मुरगुड मध्ये सकाळी साडेआठ वाजता त्यांचा मृतदेह मुंबईहून आणण्यात आला.सावर्डेकर कॉलनी येथील घरी काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता.यावेळी  परिसरातील मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मुरगूड येथील घरी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दूरध्वनी वरून कुटुंबीयांचे सांत्वन केले. वरळी विभागाचे आमदार सचिन अहिर यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.

            अंत्यसंस्कारास माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके, माजी उपनगराध्यक्ष धनाजीराव गोधडे, वस्ताद आनंदा गोधडे, राजर्षि शाहु पतसंस्थेचे उपसभापती रवींद्र ढेरे, गणेश पतसंस्थेचे संचालक उदय शहा,नंदकुमार पोतदार,विक्रम गोधडे,प्रवीण चौगले, उपस्थित होते.

            मनोहर नलगे यांचा मुंबई आणि मुरगूड येथे मोठा मित्रपरिवार आहे.पश्चात आई,दोन भाऊ,एक बहिण,मुलगा,एक मुलगी असा मोठा परिवार आहे. दि- 22 मे रोजी सकाळी 9 वा. रक्षाविसर्जन मुरगूड येथे होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *