कोल्हापूर, दि. २४ (जिमाका): सहायक महानिरीक्षक, भर्ती, महानिदेशालय, केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल (गृहमंत्रालय) नवी दिल्ली येथे हेड कॉन्सटेबल (जनरल डयुटी) चे पद सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्यूरिटी फोर्स (CISF) च्या स्पोर्टस कोटयामधील २०२३ यांच्याकडील २१५ पदे भरायची असून, ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी दिनांक २८ नाव्हेंबर २०२३ असून परिक्षेकरीता https://cisfrectt.cisf.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
योजनेंचा/जाहिरातीचा अधिकाधिक इच्छुक उमेदवारांनी या योजनेत नोंदणी करुन उमेदवारांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.