मुरगूडमधल्या कविसंमेलनात कवितांच्या वर्षावात-रसिक ओलेचिंब

मुरगूड ( शशी दरेकर ) : शहरातील ज्येष्ठ नागरीक संघ व प्रदिप वर्णे वाढदिवस सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केंद्रात कविसमेलन झाले. कवी एम डी रावण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसमेलनास रसिकांनी उस्पूर्त प्रतिसाद दिला. व कवितांच्या वर्षावात रसिक ओलेचिंब झाले . यावेळी बोलताना कवी भैरवनाथ डवरी म्हणाले ‘ सोशल मिडियाच्या युगात … Read more

नांदणी स्पोर्ट्स ठरला फौजदार चषक 2022 चा मानकरी

कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे फौजदार चषक – 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नांदणी स्पोर्ट्स ने अंतिम सामना जिंकत प्रथम क्रमांक पटकाविला व फौजदार चषकचा मानकरी ठरला. यावेळी अंतिम सामना करनूर स्पोर्ट्स, करनूर व नांदणी स्पोर्ट्स, नांदणी यांच्यात झाला. यामध्ये नांदणी स्पोर्ट्स ने प्रथम क्रमांक पटकाविला. व करनूर स्पोर्ट्सचा … Read more

उत्कंठावर्धक ‘वेड’ लावणारा टिझर…

टिझरने ’वेड’ बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षयकुमारला देखील लावले.अभिनेता रितेश देशमुख यांनी आपले मित्र अक्षय कुमार यांना वेड चा टिझर पाहण्यासाठी पाठवला आणि तो त्यांना इतका आवडला कि त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरून लगेचच शेअर केला. 20 वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार्‍या ’वेड’ या त्यांच्या आगामी चित्रपटाचा टिझर
नुकताच सोशल मीडियावर शेअर झाला आहे.

विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे तसेच या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. या पूर्वी जेनेलिया यांनी हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल 5 भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार
या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. आघाडीचे संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली
आहेत. तर गीते अजय -अतुल, गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. वेड चित्रपटाची पटकथा रुषिकेश तुराई, संदीप पाटील, रितेश देशमुख यांनी लिहिली आहे तसेच संवाद प्राजक्त देशमुख यांनी लिहिले आहेत.

सिनेमॅटोग्राफी भूषणकुमार जैन यांनी केली आहे संकलनाची जबाबदारी चंदन अरोरा यांनी पार पाडली आहे. संदीप पाटील हे कार्यकारी निर्माते आहेत. जिनिलिया देशमुख यांनी वेड चित्रपटाची निर्मिती केली आहे. आज या चित्रपटाचा टिझर मुंबई फिल्म कंपनी ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. रसिक प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता या टिझर द्वारे निर्माण झाली आहे.

संविधानिक मूल्यांच्या परिघातूनच आधुनिक भारताची उभारणी

कोल्हापूर : संविधानिक मूल्यांच्या परीघ विस्तारातूनच खऱ्या अर्थाने आधुनिक भारताची भक्कम उभारणी शक्य आहे. असा सूर शनिवारी शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘जगण्यातलं संविधान’ या विशेष परिसंवादात उमटला. संविधान दिनानिमित्त राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीने ‘जगण्यातलं संविधान ‘हा राज्यस्तरीय परिसंवाद विद्यापीठाच्या राजर्षी शाहूसभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे … Read more

सामाजिक सुधारणेचे अग्रदुत – ‘महात्मा’ जोतिबा फूले

हजारो वर्षापासुन मुक्या जनावाराप्रमाणे राबणार्‍या व जाती व्यवस्थेचे जोखड खांद्यावर वाहणार्‍या लाखो लोकांना जीवनमुक्तीने देणारा मुक्तीदाता म्हणजे महात्मा जोतिबा फुले होय. माहात्मा फुले राष्ट्रपुरुष तर आहेतच पण ते आधुनिक युगातील महामानव होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महान राष्ट्रपुरुष महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानीत. बाबासाहेबांचे तीन गुरु. भगवान गौतम बुध्द, संत कबीर आणि फुले या तीन … Read more

….. आणि भल्या मोठया नागाला जंगलात सोडून दिले जीवदान

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथे शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महाजन कॉलनीतील गवाणकर यांच्या गाडी लावण्याच्या शेडमध्ये गाडी काढण्यास गेलेल्या सनी गवाणकर यांच्या दृष्टीस एक भला मोठा नाग पडला. याची सविस्तर माहिती अशी सनी गवाणकर आपली फोर व्हिलर गाडी शेडमधून बाहेर् काढण्यास गेले होते . शेडच्या शटरचे दार वर करताच … Read more

दलितमित्र एस. आर. बाईत यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त २६ रोजी सत्कार, प्रबोधन मेळावा व गौरव ग्रंथाचे प्रकाशन

मुरगूड (शशी दरेकर) : सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते दलितमित्र एस आर बाईत यांच्या अमृत महोत्सवा निमित्त व त्यांच्या आजवरच्या सामाजिक कार्याच्या कृतज्ञतेपोटी सोनगे ता. कागल येथे २६ नोव्हेंबर रोजी प्रबोधन मेळावा चळवळीतील कार्यकर्त्यानी श्री बाईत यांच्या कार्यासंबधी कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या लेखांच्या गौरव अंकाचे प्रकाशन आणि त्यांचा सत्कार ही होणार असल्याची माहीती गहिनीनाथ सहकार समूह व नवनिर्माण … Read more

पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी जिल्ह्यात मधमाशी मित्रांची तुकडी तयार -जिल्हाधिकारी राहुल रेखावार

मध, रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात ‘मधाचे गाव’ आणि ‘रेशमाचे गाव’ उपक्रम कोल्हापूर, दि.24: मधमाशांना हानी न पोहोचवता पर्यावरणपूरक पद्धतीने मधाचे पोळे काढण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 25 मधमाशी मित्रांची तुकडी तयार झाली आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार काढून मधमाशी मित्र तयार करण्यासाठीची ही कार्यशाळा देशातील अभिनव उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.जिल्हाधिकारी … Read more

…. आणि उजळाईवाडीच्या अमित राठोडच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

मुरगूड (शशी दरेकर) : आपण समाजाचे काही तरी देणं लागतो . उपेक्षितांचे आयुष्य व त्यांचे जीवन सुंदर व्हावे. समाजात आजही काही लोक असहय वेदना घेऊन जगत आहेत. त्यानां जगण्याचे नवीन बळ मिळावे. हा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेऊन कोल्हापूरच्या ” इनरव्हील क्लब ऑफ सनराईज ” या संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत उपेक्षित महिलेला शिलाई मशीन व … Read more

कागलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा विरोधात राष्ट्रवादीकडून निषेध

कागल(प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमांना कागलमध्ये जोड़े मारो आंदोलन करून छत्रपती शिवाजी महाराजाबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आता. कागल बसस्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात बोलताना जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैया माने म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी … Read more

error: Content is protected !!